Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!

मुंबई व ठाणे मध्ये दमदार पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर देखील पानी साचले दिसून येत आहे.

Mumbai Rains | X

Mumbai Weather Prediction, June 21: काल प्रमाणेच आज सकाळपासूनच  मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई व ठाणे मध्ये दमदार पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर देखील पाणी साचलेले दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ठाणे आणि  पालघर जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने गुरुवारी सकाळी पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी केला होता.  शेजारील ठाणे शहर आणि जिल्ह्यातही रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे . गुरुवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत ठाणे शहरात 35.51 मिमी पाऊस झाला.ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडांच्या फांद्या पडण्याच्या तुरळक घटना घडल्या. IMD ने मुंबईत पुढच्या 24 तासांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. आता उद्या मुंबईत वातावरण कसे असेल ह्यासाठी हवामान विभागाने मुंबई चे उद्याचे हवामान अंदाज जाहीर केला आहे.हेही वाचा:

मुंबईत उद्याचे हवामान कसे आहे पहा?

ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे  साचले पाणी:

 

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल. त्यामुळे मुंबईकरांनो सावध रहा व गरज असली तरच घराबाहेर पडा.