Mumbai Water Tornado: मुंबईच्या समुद्रात पाहायला मिळाला Waterspout; फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हवामानातील हा बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. खटाऊ यांनी 9.15 च्या सुमारास मलबार हिलपासून 3 किमी अंतरावर पाण्यावरुन फिरणारा उभ्या स्तंभ, फनेलच्या आकाराचे ढग तयार करणारे Waterspout Or Water Tornado पाहिले. या दुर्मिळ घटनेचा फोटो पाहून तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल.

Mumbai Water Tornado (PC- Darshan Khatau Instagram)

Mumbai Water Tornado: मलबार हिलचे (Malabar Hill) रहिवासी आणि वन्यजीवप्रेमी दर्शन खटाऊ (Darshan Khatau) यांनी सोमवारी सकाळी मुंबईच्या किनाऱ्यावर एक दुर्मिळ घटना पाहिली. हवामानातील हा बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. खटाऊ यांनी 9.15 च्या सुमारास मलबार हिलपासून 3 किमी अंतरावर पाण्यावरुन फिरणारा उभ्या स्तंभ, फनेलच्या आकाराचे ढग तयार करणारे Waterspout Or Water Tornado पाहिले. या दुर्मिळ घटनेचा फोटो पाहून तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल. याविषयी माहिती देताना दर्शन खटाऊ यांनी सांगितलं की, 'मी माझ्या बाल्कनीतून बाहेर पडलो. त्यानंतर नेहमीप्रमाणे मी फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला ही किनाऱ्यावर ही दुर्मिळ घटना दिसली. मी या घटनेचे सुमारे 20 सेकंदांचे दोन व्हिडिओदेखील घेतले. परंतु, आज ढगाळ वातावरणामुळं आणि धुक्यामुळे फोटो फारसे स्पष्ट येऊ शकले नाहीत,' असंही पक्षी प्रजातींचे अभ्यास खटाऊ यांनी सांगितले.

दरम्यान, ट्विटरवर सेजू नायर यांनी Waterspout चा असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सोमवारी सकाळी मरीन ड्राईव्हजवळ ही दुर्मिळ घटना पाहिल्याचं नायर यांनी म्हटलं आहे. सोमवारी शहर व उपनगरामध्ये काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली. हिंदुस्थान टाईम्सने खटाऊ यांचे व्हिडिओ हवामान ब्युरो, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि स्वतंत्र हवामानशास्त्रज्ञ विभागाला पाठवले आहेत. या दुर्मिळ घटनेवर अनेक तज्ञांनी आपली मते मांडली आहेत. भारतीय हवामान विभागचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी यास ‘विशेषत: किनाऱ्याजवळील दुर्मिळ घटना’ म्हटले आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “हे वारंवार होत नाही. जेव्हा काही संवेदनाक्षम क्रिया घडतात त्यानंतर वादळ येते तेव्हा हवामानाचा हा प्रकार दिसून येतो. ही घटना एक प्रकारचे तुफान आहे. ते भूमीवर आणि समुद्राच्या पाण्याचे प्रवाह म्हणून ओळखले जाते. ही घटना नदी, मोठे तलाव आणि समुद्राच्या ओघात दिसून येते. पावसाळ्यामध्ये जेव्हा दाट ढग येतात, तेव्हा किनारपट्टीच्या भागात अशा घटना आढळून येऊ शकतात. (हेही वाचा - World's Longest Legs: अमेरिकेची 17 वर्षीय Maci Currin बनली जगातील सर्वात लांब पाय असणारी महिला; Guinness World Records मध्ये नाव समाविष्ट (See Photos))

 

View this post on Instagram

 

A waterspout, a rare phenomenon documented by me from home on the morning of Oct 5, 2020. The photograph is not clear due to the haze, cloudy weather and light drizzle in the morning. The Hindustan Times has covered the sighting - https://www.hindustantimes.com/mumbai-news/rare-weather-phenomenon-water-tornado-seen-off-mumbai-s-coast/story-h1hXKUUcbKWpvGEvGmkKeO.html #waterspout #weather #climatechange #instagram #watertornado #instapic #nikonphotography #nikon #naturephotography #nature #monsoon #fairweatherwaterspout #natgeo #natgeoyourshot #planetearth #bbcearth

A post shared by Darshan Khatau (@khatau) on

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात विशाखापट्टणम किनाऱ्यावरही अशा घटनेची नोंद झाली होती. याशिवाय यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात भीषण चक्रीवादळ निसर्गच्या काळात सिंधुदुर्गातील श्रीवर्धन किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या समुदायाने ही दुर्मिळ घटना पाहिली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितलं की, “ही वातावरणीय घटना आहे. हा संक्षिप्त प्रवाहांमुळे होणारा डाऊन-ड्रॉप इफेक्ट आहे, जो कमी वेळेत रोटेशनल पद्धतीने पाणी खेचतो. ”



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif