Mumbai Water Supply Update: मुंबईकरांनो BMC पाणीपुरवठा पुर्ववत होण्यासाठी लागणार 8 तासांचा विलंब

दरम्यान, नियोजित वेळेत काम पूर्ण करुन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबई शहरातील पाणीपुरवठा  (Mumbai Water Supply Update) काही काळासाठी बंद करण्यात येत असल्याची पूर्वसूचना पालिकेने आगोदरच दिली आहे. दरम्यान, नियोजित वेळेत काम पूर्ण करुन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा महापालिकेचा (BMC) प्रयत्न होता. परंतू, काम करताना ऐनवेळी काही तांत्रिक अडचणी उत्पन्न झाल्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत सुरु होण्यासाठी आणखी 8 तासांचा अतिरिक्त वेळ लागणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. दरम्यान, सायंकाळी 6 पर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत सुरु होऊ शकतो, असे पालिकेने म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिलेल्या माहितीनुसरा, 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 ते 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 या कालावधीत भांडूप येथील जल शुद्दीकरण केंद्रास पर्यायी 4000 मिमी व्यासाची जलवाहणी जोडण्यात येणार होती. तसेच, 2400 आणि 1200 मिमी व्यासाच्या झडपाही बसविण्यात येणार होत्या. त्यासोबतच गळती दुरुस्त करणे आणि इतर आवश्यक कामे करण्यात येणार होती. या सर्व कामांसाठी भांडुप येथील 1,910 दशलक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र पाठिमागील 42 वर्षांनंतर प्रथमच 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करत असताना विविध तांत्रिक समस्या उद्भवल्या. परिणामी सर्व कामे पूर्ण करताना अधिकचा कालावधी आवश्यक बनला. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सुमारे 8 तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. (हेही वाचा, Mumbai Water Cut: मुंबईकरांना; 30, 31 जानेवारीला सांभाळून पाणी वापरण्याचं आवाहन; 12 विभागांत पाणी पुरवठा राहणार बंद)

ट्विट

महापालिकेने पुढे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पाणीपुरवठा खंडीत झालेल्या भागात तो पूर्ववत करण्यासाठी आठ तासाचा विलंब लागेल. परिणामी 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 ऐवजी सायंकाळी 6.00 वाजता पाणिपूर्वठा पूर्वपदावर येणे अपेक्षीत आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन अपेक्षीत सहकार्य करावे असे पालिकेने म्हटले आहे.