Mumbai Water Supply: कुर्ला, साकीनाका भागात नागरिकांना 23 जून पासून पुढील 3-4 दिवस पाणी उकळून गाळून पिण्याचा BMC चा सल्ला

सोमवार, 23 जून रोजी 'एल' आणि 'एस' वॉर्डमधील भागातील पाणीपुरवठा बदलला जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांनी त्यांचे पाणी सुरक्षित राहावे यासाठी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Mumbai Water Supply: कुर्ला, साकीनाका भागात नागरिकांना 23 जून पासून पुढील 3-4 दिवस पाणी उकळून गाळून पिण्याचा BMC चा सल्ला
Photo Credit- X

मुंबईत कुर्ला (Kurla), साकीनाका (Saki Naka)मधील  रहिवाशांना सोमवारपासून तीन ते चार दिवस पाणी उकळून फिल्टर करण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Mahangar Palika)  केले आहे कारण महापालिका दुरुस्तीसाठी एका जलाशयातील टाकीतून दुसऱ्या टाकीत पाणीपुरवठा करत आहे.  बीएमसी कडून एल वॉर्ड मध्ये (कुर्ला परिसर) राहणार्‍या नागरिकांना सोमवार 23 जून पासून पुढील 3-4 दिवस पाणी गाळून उकळून पिण्याचा सल्ला दिला गेला आहे. महापालिकेकडून दुरुस्तीसाठी एका जलाशयातील टाकीतून दुसऱ्या टाकीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याने पाणी गाळून आणि उकळून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पवई जलाशयाच्या (Powai Low-Level Reservoir) कंपार्टमेंट 2 वरील दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, बीएमसी पाणीपुरवठा टाकीकडे हलवण्याची आणि जलाशयाच्या कंपार्टमेंट नंबर 1 वरील दुरुस्ती सुरू करण्याची योजना आखत आहे.

सोमवार, 23 जून रोजी 'एल' आणि 'एस' वॉर्डमधील भागातील पाणीपुरवठा बदलला जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांनी त्यांचे पाणी सुरक्षित राहावे यासाठी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोणत्या भागातील पाणी पुरवठा होणार प्रभावित?

कुर्ल्याच्या उत्तरेकडील एल वॉर्डमधील 90 फीट रोड कुर्ला-अंधेरी रस्ता, साकी विहार, सत्यनगर पाइपलाइन रस्ता, घाटकोपर-अंधेरी रस्ता, महात्मा फुले नगर आणि जरीमारी हे भाग प्रभावित होतील. कुर्ल्याच्या दक्षिणेकडील काजूपाडा, शास्त्री नगर, घास कंपाउंड, क्रांती नगर, एलबीएस मार्ग आणि एलआयजी-एमआयजी कॉलनी प्रभावित होतील.

एस वॉर्डमध्ये, मोरारजी नगर, पासपोली गाव आणि लोक विहार कॉलनी हे भाग प्रभावित होतील.

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).