IPL Auction 2025 Live

Mumbai Water Crisis: भर पावसाळ्यात मुंबई शहरात पाणीकपात, जाणून घ्या जलकपातीचे कारण

सध्याचा काळही पावसाळ्याच आहे. असे असले तरी मुंबई शहरामध्ये पाणीपुरवठ्याच्या बाबातीत उन्हाळा आठवतो आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुढचे केवळ काही दिवसच पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा शिल्लख आहे. परिणामी पुढच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच येत्या 1 जुलैंपासून मुंबई शहरात पाणीकपात सुरु होणार आहे.

Mumbai Water Crisis | representative pic- (photo credit -pixabay)

Mumbai Water Crisis in Monsoon: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्याचा काळही पावसाळ्याच आहे. असे असले तरी मुंबई शहरामध्ये पाणीपुरवठ्याच्या बाबातीत उन्हाळा आठवतो आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुढचे केवळ काही दिवसच पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा शिल्लख आहे. परिणामी पुढच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच येत्या 1 जुलैंपासून मुंबई शहरात पाणीकपात सुरु होणार आहे. धरणातील पाणीसाठा खालावल्यामुळे शहराला 10% पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या जलविभागाने घेतला आहे. जलविभागाने पालिका आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याचे समजते.

मुंबईला एकूण सात धरणांमधून पाणी पूरवठा केला जातो. या सर्व धरणांमध्ये मिळून आज रोजी केवळ 12.56% इतकाच पाणीसाठा शिल्लख आहे. यंदाच्या वर्षी पावसानेही काहीशी ओढ दिली. दरवर्षी साधारण 7 जूनच्या आसपास मुंबईत दाखल होणारा मान्सून यंदा चक्क 15 जून उलटला तरी आला नव्हता. आता पाठिमागील एकदोन दिवसांपासून म्हणजेच जुलै अखेरीस पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईला पाणिपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी आशा आहे. मात्र, असे असले तरी सध्यास्थितीत मात्र मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Update: सावधान! राज्यात पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून 7 जिल्ह्यांना Orange आणि Yellow Alerts)

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आणि त्यातील पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. सध्यास्थितीत सातही धरणांमध्ये मिळून 1,05,000 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लख आहे. यात उर्ध्र्व वैतरणा धरणातील 75 हजार दशलक्ष लिटर आणि फआतसा धरणातील 75 हजार दशलक्ष असे साधारण 1,50,000 हजार दशलक्ष लिटर पाणी शिल्लख आहे.