Mumbai Vehicle Parking App: काय सांगता? मुंबई शहरात पोहोचण्यापूर्वीच मिळणार पार्किंगसाठी जागा? ऑनलाईन स्लॉट बुकींग
कोणत्याही वाहनचालकाला मुंबईत प्रवास करताना, वाहन हाकताना एकच समस्या सतावते ती म्हणजे आपले वाहन उभे कोठे करायचे, वाहन पार्किंग (Vehicle Parking) कोठे शोधायचे? पण, अनेकांना भेडसावणाऱ्या या समस्येवर आता उतारा भेटला आहे. होय, आता मुंबई शहरात येण्यापूर्वीच तुम्हाला पार्किंगसाठी जागा किंवा स्लॉट बुकींग करता येणार आहे.
मुंबई शहर (Mumbai City) आणि वाहतूक कोंडी हे समिकरणच आहे. कोणत्याही वाहनचालकाला मुंबईत प्रवास करताना, वाहन हाकताना एकच समस्या सतावते ती म्हणजे आपले वाहन उभे कोठे करायचे, वाहन पार्किंग (Vehicle Parking) कोठे शोधायचे? पण, अनेकांना भेडसावणाऱ्या या समस्येवर आता उतारा भेटला आहे. होय, आता मुंबई शहरात येण्यापूर्वीच तुम्हाला पार्किंगसाठी जागा किंवा स्लॉट बुकींग करता येणार आहे. मुंबई शहरात लवकच प्राधिकरणाची मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली (Mumbai Parking Interface System) अल्पावधीतच सुरु होत आहे. या प्रकल्पासाठी 38 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकल्प खर्चीक असला तरी नागरिकांच्या दृष्टीने सोईचा असेल असे बोलले जात आहे.
मुंबईतील पार्किंग समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणाली राबण्याचे धोरण आकले आहे. त्यानुसार रस्त्याकडेला असलेल्या आणि इतरही काही ठिकाणच्या पार्किंगशी संबंधित माहितीचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंग पूल (एमपीपी) तयार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यामध्ये खासगी, सरकारी आणि व्यावसायिक अशा विविध संस्थांच्या पार्किंगची माहिती संकलीत केली जाणार आहे. ज्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना एका वेळी विविध ठिकाणी असलेल्या पार्किंगची माहिती मिळू शकेल. (हेही वाचा, Vehicle Sales In April Decline: एप्रिल महिन्यात वाहन विक्री चार टक्क्यांनी घटली, दुचाकींचा ग्राहकांसाठी संघर्ष सुरुच, FADA द्वारा आकडेवारी जाहीर)
सांगितले जात आहे की, मुंबई महापालिका, शासकिय संस्था आणि गृहनिर्मान संस्था आदींमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागांचीही माहिती नागरिकांना समजणार आहे. ही सर्व माहिती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. लवकरच याबाबत एक अॅप उपलब्ध करुन दिले जाईल. ज्यामुळे नागरिकांना पार्किंगची इत्यंभूत माहिती कळू शकेल अशी आशा आहे.