मुंबई: 10 रुपयाचा वाद बेतला जीवावर! माथेफिरू भाजी विक्रेत्याने ग्राहकाला सुऱ्याने भोकसले

यामध्ये विक्रेत्याने ग्राहकावर धारदार चाकूने वार केला, या ग्राहकाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Vegetable Vendor Stabbed Customer (Photo Credits: ANI)

दादर: फेरीवाले (Hawkers) , भाजीवाले (Vegetable Vendors) यांच्याशी दोन चार रुपयांसाठी हुज्जत घालणारी मंडळी आपण नेहमीच पहिली असतील.पण अशा प्रकारे भाजीसाठी भाव करणं काल दादर (Dadar) मधील एका गृहस्थाच्या जीवावर बेतलं आहे.सोमवारी रात्री दादर रेल्वे स्थानकाच्या (Dadar Railway Station) बाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेता आणि ग्राहकामध्ये भाजीच्या किंमतीवरून वाद झाला .केवळ दहा रुपये कमी करण्यावरून सुरु झालेला हा वाद यात शब्दाला शब्द वाढत जाऊन इतका पेटला की या भाजीवाल्याने ग्राहकावर आपल्या जवळील धारदार चाकूने वार केला. यांनतर घायाळ ग्राहक गृहस्थाला तातडीने जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं पण तिथे गेल्यावर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या एकूणच प्रकरणाने सध्या आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात माहिती मिळताच रेल्वेस्थानकातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोवर हा माथेफिरू भाजी विक्रेता फरार झाला होता.काही वेळा पूर्वी या आरोपीला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस सध्या सखोल तपास करत  आहेत. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना फेरीवाल्यांची मारहाण; पोलिसी खाक्या दाखवत चार जण ताब्यात (व्हिडीओ)

ANI ट्विट

 हे ही वाचा -मुंबईची शान CSMT परिसर होणार फेरीवाले, भिकारी आणि गर्दुलेमुक्त; 1 मे पासून नियम लागू

दरम्यान रेल्वे स्थानकाच्या परिसरात भाजी विक्रेत्यांना परवानगी नसताना ही मंडळी नेहमीच याठिकाणी उघडपणे विक्री करत असतात.यामुले हा परिसर नेहमीच गर्दीने तुडुंब भरलेला असतो.यामुळे येणाजाणऱ्या प्रवाशांना सुद्धा बरीच गैरसोय होते मात्र तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाहीये. या प्रसंगानंतर तरी प्रशासन या अनधिकृत विक्रेत्यांवर बंदी आणणार का हे पाहणे आवश्यक आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif