Mumbai University Admission 2020: मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; येथे पहा संपूर्ण वेळापत्रक

कोविड-19 च्या संकटामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातही उशिरा होत आहे.

First Year Admission | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी (HSC) चा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. कोविड-19 (Covid-19) च्या संकटामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातही उशिरा होत आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाशी (Mumbai University) संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीला 18 जुलै पासून सुरुवात झाली आहे. या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना 4 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. शहरी भागांमध्ये ऑनलाईन (Online) पद्धतीने प्रवेश प्रकिया सुरु होईल. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या भागांत ऑफलाईन (Offline) पद्धतीने प्रवेश प्रकिया पार पडेल.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रकीयेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 18 जुलैपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीमध्ये आतापर्यंत तब्बल 67 हजार 514 विद्यार्थांनी रजिस्ट्रेशन केले आहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी 56 हजार 129 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. (बारावीच्या विद्यार्थ्यांना Revaluation,Photocopy साठी 17 जुलै पासून करता येणार verification.mh-hsc.ac.in वर अर्ज)

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक:

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 22 जुलै ते 4 ऑगस्ट (दुपारी 1 पर्यंत)
अर्ज विक्री 24 जुलै ते 4 ऑगस्ट
अर्ज भरुन सब्मिट करणे 27 जुलै ते 4 ऑगस्ट (दुपारी 3 पर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी 4 ऑगस्ट (सायंकाळी 7 वाजता)
कागदपत्रं पडताळणीआणि शुल्क भरणे 5 ते 10 ऑगस्ट (दुपारी 3 पर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी 10 ऑगस्ट (7 वाजता)
कागदपत्रं पडताळणीआणि शुल्क भरणे 11 ते 17 ऑगस्ट (दुपारी 3 पर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट (7 वाजता)
कागदपत्रं पडताळणीआणि शुल्क भरणे 18 ते 21 ऑगस्ट

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट देवून यातील Mumbai University Pre Admission online Registration 2020-21 या लिंकवर क्लिक करा. नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी 022-66834821 या क्रमांकावर संपर्क करावा.