मुंबई: वांद्रे येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक

ही घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली होती. कॉफीच्या दुकानाकडे जात असताना आरोपींनी बाईक थांबवून विनयभंग केल्याचा आरोप पीडिताने केला होता. यावरुन स्थानिक पोलिसांनी या दोघांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबईच्या (Mumbai) वांद्रे (Bandra) येथील पालीनाका (Pali naka) परिसरात एका महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली होती. कॉफीच्या दुकानाकडे जात असताना आरोपींनी बाईक थांबवून विनयभंग केल्याचा आरोप पीडिताने केला होता. यावरुन स्थानिक पोलिसांनी या दोघांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु, या घटनेनंतर पालीनाका परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

भोलादत्त हारभोळा (40) आणि लल्लन राय (30) असे आरोपींचे नावे असून हे दोघही कलीना परिसरातील रहवासी आहेत. पीडीत महिला 5 ऑक्टोबर पालिनाका येथे रात्री 10.30 सुमारास कॉफीच्या दुकानाकडे जात असताना भोलादत्त आणि लल्लन हे दोघेही बाईकवरुन जात होते. पीडित ही एकटीच रस्त्यावरुन जात असल्याचे पाहून आरोपींनी बाईक थांबवली. यानंतर भोलादत्त यांनी पीडित महिलेच्या अंगाला स्पर्श करत विनयभंग करु लागला. त्यावेळी पीडित आरडाओरडा करु लागल्याने या दोघांनी संबधित ठिकाणावरुन पळ काढला. पीडितने ही घटना तिच्या मित्राला सांगिल्यानंतर त्याने तिला पोलिसात तक्रार करण्याचे सुचवले. पीडित महिलेने ताबडतोब इ-मेल आणि ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसात तक्रार नोंदवली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. हे देखील वाचा- ठाणे: 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा

ज्या परिसरात ही घटना घडली. तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवून पोलिसांनी आरोपीच्या बाईकचा नंबर मिळवला. ही बाईक आरोपी भोलादत्त याच्या नावावर असून पोलिसांनी कलीना येथून त्याला अटक केली. भोलादत्त याचा मित्र लल्लन यालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.