Mumbai Traffic Update: 1 जून पासून परेल टी टी फ्लायओव्हर वर दूचाकी, अवजड वाहनांसह बेस्ट बसला ही प्रवेशबंदी

त्यानंतर महिनाअखेरीस हाईट बॅरिअर लावले जाणार आहेत. त्यामुळे 1 जूनपासून या पुलावरून दुचाकी, अवजड वाहनं यांना मज्जाव असणार आहे.

Traffic (Photo Credit- PTI)

मुंबई (Mumbai)  मध्ये आता परेल टीटी फ्लायओव्हर (Parel TT Flyover) वर दूचाकी, अवजड वहानांसह पब्लिक ट्रान्सपोर्ट बस यांनादेखील प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 1 जूनपासून हा वाहतूकीमधील बदल लागू केला जाणार असल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. पालिकेने एक नोटिफिकेशन जारी करत ही माहिती दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग वरील हा जुना पूल आता अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुंबई ट्राफिक पोलिसांकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यात आल्याची माहिती देखील बीएमसीने दिली आहे. दक्षिण मुंबई जाण्यासाठी हा पूल एक महत्त्वाचा दुवा आहे.

पालिकेकडून या पूलावर 2.5 मीटरचा हाईड बॅरिअर इंस्टॉल केला जाणार आहे. त्यामुळे बेस्ट बस सह कोणतीही अवजड वाहनं या पूलावरून जाऊ शकणार नाहीत. 'पालिकेने आता पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं आहे. अवजड वाहानांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे ट्राफिक पोलिसांनी पालिकेच्या ब्रीज विभागाला त्याबाबत काळजी घेत अवजड वाहनांना प्रवेशबंदीच्या सूचना केल्या. पण आता पूलावरून वाहतूक बंद केल्याने याभागातील वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. परेल पासून जवळच असलेला लोअर परेल भागातील Delisle bridge देखील बंद असल्याने आधीच या भागात ट्राफिक वळवून कोंडी वाढवली आहे. Pune Traffic Police Video Viral: दुचाकीस्वारांकडून लाच घेणे वाहतूक पोलिसांना पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचे निलंबन.

पालिकेकडून पहिल्यांदा या पूलावरील खड्डे बुजवले जाणार आहेत. त्यानंतर महिनाअखेरीस हाईट बॅरिअर लावले जाणार आहेत. त्यामुळे 1 जूनपासून या पुलावरून दुचाकी, अवजड वाहनं यांना मज्जाव असणार आहे. ऑक्टोबरपासून हा पूल डागडुजीच्या कामासाठी देखील बंद ठेवला जाणार आहे. सहा महिने पूल त्यासाठी देखील बंद राहील.