Holi 2020 च्या दिवशी मुंबई ट्राफिक पोलिस कडून Drink and Drive अंतर्गत 500 जणांना अटक तर 5326 जणांवर वाहतूकीचे नियम मोडल्याने गुन्हा दाखल
तर 5326 जणांवर वाहतूकीचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचं सावट होते मात्र तरीही मुंबईकरांनी बिनधास्तपणे धुळवडीच्या सणाचा आनंद लुटला. दरम्यान शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच वाहतूक नियम धाब्यावर बसवणार्यांवर चाप लावण्यासाठी सुमारे 40,000 पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यानुसार होळी आणि धुळवडीच्या उत्साहात बेफाम झालेल्या 500 जणांना ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह च्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तर 5326 जणांवर वाहतूकीचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Holi 2020: होळी सणाच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 हजारांहून अधिक पोलीस मुंबईच्या रस्त्यांवर तैनात.
मुंबई पोलिसांनी केलेल्या कारावाईमध्ये काल मध्य रात्रीपर्यंत 5326 जणांवर कारवाई केली आहे. तर 1285 जणांवर वाहनाचा वेग ओलांडल्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 3086 जणांवर ट्रीपल सीट आणि 3086 जणांच्या विरोधात हेल्मेट न घातल्याने कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षी नोंदवण्यात आलेल्या 10,675 गुन्ह्यांपैकी 4738 केसेस या हेल्मेट न घालणार्यांच्या, 789 जण ट्रिपल सीट तर 725 ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह आणि 430 जण वाहतूकीचा वेग ओलांडल्याच्या गुन्हाखाली पोलिसांच्या रडारवर होते.
होळी आणि धुळवडीच्या सणाची रंगत वाढवण्यासाठी अनेकजण भांग, थंडाईचा आस्वाद चाखतात. त्यामुळे तळीरामांना रोखण्यासोबत अपघातांवर नियंत्रण ठेवण्याचं आव्हान असते. त्यामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी मुंबई ट्राफिक पोलिसांकडून नाकाबंदी कारण्यात आली होती. मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये कोरोनासुराची प्रतिकात्मक मूर्ती बनवून ती होलिका दहनाच्या दिवशी जाळण्यात आली.दरम्यान राज्यात कोरोनाचे 5 रूग्ण आहेत.