मुंबई: सायन फ्लायओव्हर वर डंम्पर उलटल्याने 'ट्राफिक जाम' (Watch Video)

आज सकाळच्या वेळेतली ही घटना असून दोन क्रेन्सच्या मदतीने उलटलेला डंम्पर बाजूला काढण्यात मुंबई वाहतूक पोलिसांना (Mumbai Traffic Police) यश आलं आहे.

Sion Flyover Accident ( Photo credits/ Twitter)

मुंबईकरांची सकाळच्या वेळेस ऑफिसला वेळेवर पोहचण्याची घाई असतानाच मध्य मुंबईमध्ये एका अपघातामुळे ट्राफिक जाम झालं आहे. सायन फ्लायओव्हरवर (Sion Flyover) एक डंपर (Dumper) उलटल्याने ट्राफिक जाम झाले आहे. आज सकाळच्या वेळेतली ही घटना असून दोन क्रेन्सच्या मदतीने उलटलेला डंम्पर बाजूला काढण्यात मुंबई वाहतूक पोलिसांना (Mumbai Traffic Police) यश आलं आहे. मात्र यामुळे झालेली वाहतूक कोंडी मोकळी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा व्हिडिओ  

सध्या मुंबईमध्ये रस्त्ता दुरूस्तीची कामं, मेट्रो प्रोजेक्ट्ससाठी सुरू असलेलं खोदकाम आणि इतर ब्रीजचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला आहे. सकाळच्या सायनकडून दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई या भागामध्ये अनेक मुंबईकर प्रवास करत असतात. त्यामुळे सायन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याचं चित्र आहे.