मुंबई मधील मोरलँड रोडवर CAA, NRC आणि NPR विरोधात मागील 50 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती; COVID19 धोका टाळण्यासाठी महिला आंदोलकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा वाढता धोका पाहता आंदोलनही तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे.

Protest against CAA, NRC & NPR in Mumbai (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सारं काही ठप्प राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) मधील मोरलँड रोडवर (Morland Road) CAA, NRC आणि NPR विरोधात मागील 50 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन थांबवण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता आंदोलनही तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. विभागीय डिसीपी अभिनश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा झपाट्याने होणार प्रसार पाहता आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय महिला आंदोलकांनी घेतला आहे. (महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन, कलम 144 लागू : उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन)

केंद्र सरकारने देशात सीएए लागू केल्यानंतर देशभरात तणावपूर्ण वातावरण होते. राजधानी दिल्लीमध्ये एकच वादंग उठला होता. यामुळे CAA, NRC विरोधक आणि समर्थक असे दोन गट पडले होते. याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु होती. मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे त्यांना स्थगिती मिळाली आहे.

ANI Tweet:

महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर लागू करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचाही विरोध होता. तसंच सीएए आणि एनपीआर, एनआरसीवरून घाबरुन जावू नये असे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेने आश्वस्त केले होते.