मुंबई: महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील तात्रिक बिघाड दूर; विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वे वाहतूक पूर्ववत
त्यामुळे या मार्गावर होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. परिणामी या संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली. या सर्व प्रकारात दादर ते चर्चगेट या स्टेशनदरम्यान असलेल्या सर्व लोकल जागीच थांबविण्यात आल्या.
मुंबई: तांत्रिक बिघाड झाल्याने विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची (Western Railway Mumbai) वाहतूक अखेर पुन्हा सुरु झाली आहे. बुधवारी (7 ऑगस्ट 2019) सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी रेल्वे स्थानक (Mahalaxmi Railway Station) नजीक ओव्हरहेड वायरवर केबल पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने मुंबईकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, रेल्वे प्रशासनाने तातडीने बिघाड दूर करत रेल्वे सेवा पूर्ववत सुरु केली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या चर्चगेट ते दादर स्टेशनपर्यंत असलेल्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत होती. गेले काही दिवस मुंबईत असलेला पावसाचा कहर. त्याचा रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम आणि प्रवाशांची गैरसोय विचारात घेता रेल्वे प्रशासन सतर्क आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसरात झालेला तांत्रिक बिघाड वेळीच दूर करत रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली.
पश्चिम रेल्वे ट्विट
प्राप्त माहितीनुसार, महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान बाहेरून जाणारी एक केबल पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडली. त्यामुळे या मार्गावर होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. परिणामी या संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली. या सर्व प्रकारात दादर ते चर्चगेट या स्टेशनदरम्यान असलेल्या सर्व लोकल जागीच थांबविण्यात आल्या. (हेही वाचा, मुंबई: विरार प्लॅटफॉर्मवर गर्भवती महिलेला घेऊन जाण्यासाठी चक्क रिक्षाची धाव (Watch Video))
पश्चिम रेल्वे ट्विट
मुंबई शहरातील नोकरदार वर्गासोबतच इतरही अनेक मुंबईकर कामासाठी भल्या सकाळी घराबाहेर पडतात. दिवसभरातील काम पूर्ण झाल्यानंतर हे मुंबईकर आपल्या घराच्या दिशने निघतात. त्यासाठी मुंबई रेल्वे हा एकमेव वेगवान आणि खिशाला परवडणारा प्रवास ठरतो. त्यामुळे जवळपास सर्वच मुंबईकर रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. अशा वेळी जर रेल्वेवावाहतूक विस्कळीत झाली तर, प्रवाशांना त्रास होतोच. पण, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरही ताण येऊन ती कोलमडण्याची शक्यता निर्माण होते.