Maharashtra Vidhan Bhavan: विधानभवन परिसरात बेस्ट बसमध्ये सापडलेल्या संशयास्पद बॅगमुळे धावपळ

ज्या बसमध्ये ही बेवारस आणि संशयास्पद बॅग सापडली ती बस मुंबई बेस्टची (Mumbai BEST) आहे. विधानभवन इमारतीच्या नजीकच्या अंतरावरच एका बस थांब्यावर उभ्या असलेल्या या बसमध्ये ही बॅग आढळून आली आहे.

Maharashtra Legislature | (File Photo)

विधानभवन (Maharashtra Vidhan Bhavan ) परिसरात एका बसमध्ये बेवारस आणि संशयास्पद बॅग सापडल्याचे वृत्त आहे. ज्या बसमध्ये ही बेवारस आणि संशयास्पद बॅग सापडली ती बस मुंबई बेस्टची (Mumbai BEST) आहे. विधानभवन इमारतीच्या नजीकच्या अंतरावरच एका बस थांब्यावर उभ्या असलेल्या या बसमध्ये ही बॅग आढळून आली आहे. मुंबई पोलिसांना या बॅगबाबत माहिती देण्यात आली आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. दरम्यान, या बेस्ट बसची बॉम्बशोध पथकाने तपासणी केली. बॅगमध्ये संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही. ही बॅग बॅग मरीन लाईन्स पोलिसांकडे जमा करण्यात आली.

एखादा प्रवासी ही बॅग विसरुन गेला असावा असा प्राथमिक संशय आहे. बॅगमध्ये काहीही संशयास्पद आढळले नसल्याने सर्वांनिच सुटकेचा निश्वास टाकला. काही काळ मात्र परिसरात चांगलीच धावपळ उडाली होती.  (हेही वाचा, Corona Vaccination Update: आता दोन डोस पुर्ण झालेल्या लोकांनाच मिळणार बेस्टच्या बसमध्ये एंन्ट्री, आजपासून लागू होणार नियम)

विधानभवन हे महाराष्ट्राचा गाडा हाकणारी इमारत. याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि सर्व आमदार, खासदार यांचा वावर असतो. शिवाय राज्य सरकारने घेतलेले सर्व निर्णय प्रशासनात तळागाळापर्यंत पोहोचविणारी राज्याची मुख्य प्रशासकिय इमारतही याच परिसरात आहे. तसेच, इतरही अनेक महत्त्वाची आणि मुख्य कार्यालयेही याच परिसरात आहे. त्यामुळे संशयास्पद बॅगचा कसून तपास केला जात आहे.