Powai Stone Pelting: मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमण हटविणाऱ्या BMC पथकावर दगडफेक, पोलीस कर्मचारीही जखमी (Watch Video)

अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांच्या पथकावर स्थानिकांनी जोरदार हल्ला आणि दगडफेक केल्याचे वृत्त आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरविण्यासाठी कर्तव्यावर गेलेले काही पोलीस (Mumbai Police) या दगडफेकीत जखमी झाल्याचे समजते.

Mumbai Stone Pelting | (Photo Credit: X)

Mumbai Stone Pelting: अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांच्या पथकावर स्थानिकांनी जोरदार हल्ला आणि दगडफेक केल्याचे वृत्त आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरविण्यासाठी कर्तव्यावर गेलेले काही पोलीस (Mumbai Police) या दगडफेकीत जखमी झाल्याचे समजते. ही घटना मुंबई उपनगरातील पवई (Powai Stone Pelting) परिसरात गुरुवारी (6 जून) दुपारी घडली. या घटनेचे काहींनी मोबाईलद्वारे चित्रीकरण केले असून त्यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनधिकृत बांधकामे झाल्याच्या तक्रारीनंतर कारवाई

पवई परिसरातील भीमनगर येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याच्या तक्रारी बीएमसीला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पालिका कर्मचारी प्राप्त आदेशावरुन कारवाईसाठी गेले. या वेळी स्थानिक नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला. पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले. या वेळी त्यांचा आणि पालिका कर्मचारी तसेच पोलिसांशी संघर्ष झाला. त्यातून वाद वाढत गेला आणि अचानक दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी तातडीने पोटेक्शन शील्डचा वापर केला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे संरक्षण होऊ शकले. (हेही वाचा, Dahisar: प्रवाशांनी भरलेल्या BEST च्या बसवर दगडफेक; अनेक प्रवासी जखमी (Watch Video))

परिसरात दोन महिन्यांपूर्वी आगीची मोठी घटना

दरम्यान, भीमनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी मोठी आग लागली होती. या वेळी झालेले मोठे नुकसान विचारात घेऊन या भागातील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. त्यातील काही राहिल्या होत्या त्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने नोटीस पाठवली होती. या नोटीसनुसार पालिकेने जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर पोलिका कर्मचारी आज कारवाईसाठी आले असता स्थानिक नागरिकांनी त्यांना जोरदार विरोध केला. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन पालिकेने ही कारवाई तात्पूरत्या स्वरुपात थांबवली आहे.

उच्चभ्रू परिसराजवळ झोपडपट्टी

दरम्यान, येरवी पवई ही उच्चभ्रू परिसर म्हणन ओळखला जातो खरा. पण येथे उच्चभ्रू परिसरासह मोठ्या प्रमाणावर चाळी आणि झोपडपट्टी परिसरही आहे. खास करुन इथला रमाबाई आंबेडकर नगर, गौतम नगर, इंदिरा नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी नगर, हरिओम नगर आदी परिसर झोपडपट्टीचा परिसर म्हणून ओळखला जातो. पाठिमागील 25 वर्षांपासून या ठिकाणी झोपड्यांचे प्रमाण वाढत गेले आहे.

व्हिडिओ

प्राप्त माहितीनुसार, पवईतील या भागात सन 2005 मध्ये कामगारांसाठी ट्रान्झिस्ट कॅम्प तात्पूरत्या स्वरुपात उभारण्यासाठी परवानगी दिली गेली. दरम्यान, कॅम्पच्या आधाराने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अधिक्रण झाले आणि पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये ते वाढतच गेले. त्यानंतर पालिकेने अनेकदा नोटीस पाठवून आणि कारवाईचा इशारा देऊनही हे अतिक्रमण कमी झाले नाही. उलट ते वाढतच गेले. परिणामी सुरुवातीला छोट्याशा स्वरुपात असलेला झोपडपट्टीचा परिसर पुढे अतिशय विस्तारीत झाला. जो हटवताना आता महापालिकेच्या नाकीनऊ आले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now