Mumbai Shocker: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे फेक फेसबूक अकाऊंट बनवत महिलांना मॅसेज; पोलिसांनी ठोकल्या 28 वर्षीय कॅब ड्रायव्हरला बेड्या

गणपत गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ चर्चेत आला होता ज्यामध्ये त्यांच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मॉर्फ करण्यात आला होता. दरम्यान ही व्हिडिओ वायरल होत असल्याला 8 दिवस होताच आता हे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून महिलांना मॅसेज पाठवण्याचे प्रकरण समोर आले आहे.

Arrest pixabay

कल्याण पोलिसांकडून एकाला भाजपा आमदाराचं फेक फेसबूक अकाऊंट (Fake Facebook Account) बनवत महिलांना मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड (Kalyan East BJP MLA Ganpat Gaikwad) यांच्या नावे हे अकाऊंट बनवण्यात आले होते. काही महिलांनी आमदारांना फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवल्याच्या किंवा मेसेज केल्याबाबत विचारणा केली असता ही बाब प्रकाशात आली. जेव्हा त्यांना समजलं की काही महिलांना अशाबाबतचे मेसेज गेले आहेत तेव्हा त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर कोळसेवाडी पोलिस स्टेशन (Kolsewadi Police Station) मधून पुढील कारवाईला सुरूवात झाली.

अकाऊंटचे ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग झाल्यानंतर पोलिसांना आरोपीचा मागोवा लागला. शनिवारी पोलिसांनी चंदन शिर्सेकर या 28 वर्षीय तरूणाला अटक केली. हा तरूण कोसळेवाडीचा रहिवासी होता. तो कारवाई मध्ये दिरंगाई करण्यासाठी वेगवेगळ्या वाय फाय आणि हॉटस्पॉट्सचा वापर करत होता. आमदार गायकवाड यांचा दावा आहे की हा आरोपी कोणाच्यातरी आदेशावरून त्यांना बदनाम करण्यासाठी काम करत असावा. अटकेनंतर आरोपीला कोर्टात सादर केले होते. कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. Modi Govt New Cyber Security Policy: मालवेअर अॅटेक रोखण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल;  नवी सायबर सुरक्षा रणनिती तयार .

गणपत गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ चर्चेत आला होता ज्यामध्ये त्यांच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मॉर्फ करण्यात आला होता. दरम्यान ही व्हिडिओ वायरल होत असल्याला 8 दिवस होताच आता हे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून महिलांना मॅसेज पाठवण्याचे प्रकरण समोर आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now