Mumbai Shocker: अंधेरी मध्ये बलात्कार पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी अ‍ॅसिड हल्ला करून धमकवण्याचा प्रयत्न

रात्री अकराच्या सुमारास कामावरून परतताना अचानक एका व्यक्तीने फुगा मारला त्यामध्ये नोट होती.

Molestation| File Photo

मुंबई मध्ये एका बलात्कार पीडीतेला तिची तक्रार मागे घेण्यासाठी अ‍ॅसिड हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. आरोपीने अ‍ॅसिडने भरलेला फुग तिच्यावर फेकल्याचं वृत्त समोर आलं आहे. मीड डे च्या रिपोर्टनुसार, 'बॉबी भोले च्या विरूद्धची तक्रार मागे घे' अशी नोट देखील सापडली आहे. हा प्रकार मुंबईच्या अंधेरी परिसरात घडला आहे. जून महिन्यात एका तरूणीने बॉबी भोले विरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यामध्ये खंडणी आणि बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत.

पोलिस तक्रारी मध्ये तरूणी नोंदवलेल्या जबाबामध्ये ती अंधेरी पूर्वेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर बिस्लेरी जंक्शन वर रिक्षाची वाट पाहत होती. रात्री अकराच्या सुमारास कामावरून परतताना अचानक एका व्यक्तीने फुगा मारला त्यामध्ये नोट होती. यामध्ये पोलिस तक्रार मागे घेण्याचा उल्लेख असल्याचा तिचा दावा आहे. दरम्यान तरूणीच्या पायावर भाजल्याच्या जखमा आहेत.

हिंदुस्तान टाईम्स सोबत बोलताना अंधेरी पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर इंद्रजित मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉबी भोले याच्याकडून अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न केला का? त्याने कुणाला ते काम दिले होते का? याचा तपास सुरू आहे. सोबतच त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरू आहे. (नक्की वाचा: Mumbai Murder Case: वांद्रे परिसरात 21 वर्षीय तरूणाकडून प्रेयसीची हत्या; खोट्या बलात्काराच्या आरोपांना, दीड लाख रूपयांच्या मागणीतून उचललं टोकाचं पाऊल).

सहार पोलिस स्टेशन मध्ये तिने दिलेल्या माहितीमध्ये पीडीतेला तक्रार दाखल केल्यापासून वारंवार धमक्या येत असल्याचंही तिने म्हटलं आहे.