Mumbai Shocker: प्रियकराने 19 वर्षांच्या प्रेयसीवर बलात्कार केला, श्रद्धा वालकरसारखी हत्या करण्याची दिली धमकी
ह्या छळाला कंटाळून पीडित तरुणीने पोलीसांकडे धाव घेतला. प्रेमाच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीची पोलिसांकडे तक्रार केली आहे.
Mumbai Shocker: प्रियकराने 19 वर्षांच्या प्रेयसीवर वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. सतत तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्या प्रकरणी तीने पोलीसांकडे धाव घेतला. प्रियकराने तिला श्रध्दा वालकरसारखी जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. श्रध्दा वालकर हत्या प्रकरणी संपुर्ण देश हादरला होता. श्रध्दाच्या प्रियकराने तिची हत्या केली. तिच्या शरीराचे तुकडे केले आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी मुख्तार अहमद अली सय्यद 24 भांडूप येथील रहिवासी आहे. 2020 पासून त्या पीडित तरुणीला अहमद अली सय्यद भेटत होता. सतत कॉल आणि मेसेजद्वारे तिच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली आणि नंतर तिला वर्सोवा आणि पवईला फिरायला नेले.
तरुणीला आरोपीकडून ब्लॅकमेल
सय्यदने पीडित तरुणीला बहाण्याने कांजूरमार्ग येथील सनशाईन लॉजवर बोलावले. यादरम्यान तिच्यावर शारिरीक छळ केला. आणि त्यानंतर वडिलांना ह्या घटनेची माहिती देण्याची धमकी देऊन अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सततच्या छळाला कंटाळून पीडितेने त्याच्या कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले.
यानंतर 2 जून रोजी सय्यदने तिला सांगितले की जर तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर तीची हालत श्रद्धा वालकरसारखी करण्यात येईल. अखेर ह्या सर्वांला कंटाळून हिंमत दाखवत शुक्रवारी पोलीसांकडे धाव घेतली. सय्यदविरुद्ध कलम 376 (बलात्कार), 376 (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 506 (गुन्हेगारी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेचा. फरार आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.