Mumbai Shocker: मुलीच्या अफेअर वरून माय-लेकीत टोकाचा वाद; आईने केली पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या
मुलीच्या गळ्यावर व्रण आणि आईच्या हातावरील जखम पाहून संशय बळावला आणि मुलीची मेडिकल टेस्ट करण्यात आली तेव्हा गळा दाबून मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
मुंबई मध्ये माय-लेकीत झालेल्या वादाचं पर्यावसन खूनामध्ये झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या प्रेमसंबंधांवरून आई आणि मुलीमध्ये वाद झाले. हे वाद इतके टोकाला गेले की आईने मुलीची गळा दाबून हत्या केली. ही घटना वांद्रे पूर्व परिसरातील आहे. मुलगी हाताला चावली आणि त्याची प्रतिक्रिया देताना आईने थेट मुलीचा गळा दाबला. मुलीच्या हत्येनंतर आईने तिला मिरगी आल्याचा बनाव केला. मात्र मेडिकल टेस्ट मध्ये मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.
भुमिका बागडे असं मृत मुलीचं नाव आहे. भुमिका19 वर्षांची होती. आई टीना सोबत भूमिका वांद्रे पूर्व भागात राहत होती. लोकसत्ताच्या वृत्तानुसार, पोलिसांच्या माहितीप्रमाणे मृत मुलीचे प्रेमसंबंधांवरून आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. आईला मुलीच्या अफेअरची कुणकुण लागताच तिने नाराजी व्यक्त केली. मात्र आईवर मुलीने राग काढत तिच्या हाताला इजा केली आणि चावा घेतला. यावेळी प्रतिक्रिया देताना आईने मुलीचा गळा आवळला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. मात्र घाबरलेल्या आईने मुलीला मिरगीचा झटका आल्याचं सांगत डीएन देसाई हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. नक्की वाचा: Mother Kills Son In Goa: चार वर्षाच्या मुलाची गोव्यात हत्या, सीईओ महिलेस अटक .
मुलीच्या गळ्यावर व्रण आणि आईच्या हातावरील जखम पाहून संशय बळावला आणि मुलीची मेडिकल टेस्ट करण्यात आली तेव्हा गळा दाबून मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करून आरोपी महिलेवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2024 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

