Mumbai Shocker: मुंबई मध्ये धक्का लागल्याच्या रागात तरूणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला; आरोपी अटकेत

त्यांना अटक करून पोलिसांनी सार्‍या आरोपींविरूद्ध कलम 307, 323, 504, आणि 34 लावण्यात आला.

Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 21 वर्षीय मुलाला रस्त्यात चालताना धक्का लागल्याच्या रागातून हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना वांद्रे (Bandra East) भागातील आहे. आरोपीचं नाव वासिम अक्रम अंसारी (Wasim Ansari) आहे. रस्त्यात चालताना धक्का लागल्याच्या रागात त्याने चक्क 25 वर्षीय एका तरूणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. ही घटना 16 डिसेंबरची आहे.

Indian Express,च्या रिपोर्ट्सनुसार, आरोपी आणि त्याचे मित्र यांना अटक केली आहे. निर्मल नगर पोलिस स्टेशन आणि क्राईम ब्रांच कडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. हल्ला झालेल्या मुलाच्या चुलत भावाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. नक्की वाचा: Thane: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर स्थानिकांचा हल्ला; 10 पोलिस जखमी .

पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 16 दिवशी साहिल खान चा वसीम अक्रम अन्सारी यांच्याशी वाद झाला. रस्त्यातून चालताना धक्का लागला आणि हा वाद झाला. वादावादीमध्ये अन्सारी ने खानवर स्क्रु ड्रायव्हरने हल्ला केला. यामध्ये खान च्या डाव्या डोळ्याला जखम झाली. नंतर त्याचा चुलतभाऊ फारूख हफिज खान त्याच्या मदतीला पोहचला. त्यावेळी अंसारी आणि त्याच्या मित्रांनी चुलत भावाला मारलं. त्यानंतर तातडीने खान आणि फारूखला भाभा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. खानच्या स्टेटमेंट वरून पोलिसांनी अंसारी, अली सय्यद, समिर आणि एका अनोळखी व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पुढे कारवाई करत अंसारी आणि सय्यद यांचा शोध सुरू केला. त्यांना अटक करून पोलिसांनी सार्‍या आरोपींविरूद्ध कलम 307, 323, 504, आणि 34 लावण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif