Mumbai Shocker: गोवंडी येथे थरार, जावई आणि लेकीची हत्या; घटना पाहून नागरिकांना आठवला 'सैराट' सिनेमा

मुंबईतील गोवंडी परिसरात मुलीने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केल्याने कुटुंबियांना राग अनावर झाला. त्यांनी गोड बोलून जावयाला घरी बोलावलं. त्यानंतर त्याची गळा चिरून हत्या केली.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईत गुन्हेगारीच्या (Mumbai Crime News) घटनेत वाढ झाली असून आता सैराटची पुनरावृती घडली आहे.मुंबईतील गोवंडी परिसरात मुलीने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केल्याने कुटुंबियांना राग अनावर झाला. त्यांनी गोड बोलून जावयाला घरी बोलावलं. त्यानंतर त्याची गळा चिरून हत्या केली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मुलीचाही गळा आवळून हत्या केली. या घटनेनं गोवंडी परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. (हेही वाचा - Gangsters from Punjab Arrested In Mumbai: मुंबई च्या कुर्ला मधून पंजाबचे दोन गॅंगस्टर अटकेत; किडनॅपिंग ते खूनाचा प्रयत्न 11 विविध प्रकरणात आरोपी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण चंद्र (22 वर्ष) हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून गुलनाज खान (20 वर्ष) ही गोवंडी परिसरात राहत होती. एकाच परिसरात राहत असल्याने दोघांमध्ये ओळख झाली. कालांतराने दोघांचंही एकमेकांवर प्रेम झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीचे वडिल गोरा खान, भाऊ सलमान खान, त्याचा मित्र मोहम्मद कैफ, नौशाद खान यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्याने तिच्या वडिलांच्या मनात राग होता. याच रागातून त्यांनी दोघांची हत्या करण्याचा प्लान आखला. आरोपींनी दोघांनाही घरी बोलावलं. आरोपींनी आधी जावयाची गळा चिरुन हत्या केली. नंतर मुलीचाही गळा आवळून हत्या केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement