Mumbai Shocker: लालबाग मध्ये लेकीनेच केला आईचा खून; मृतदेहाचे तुकडे करून ठेवले प्लॅस्टिकच्या बॅगेत

आयपीसी 302 अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lalbagh Murder | Twitter

दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर आता मुंबई मध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. लालबाग भागामध्ये एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये सापडला आहे. मुलीनेच आईची हत्या करून तिचा मृतदेह घरात ठेवल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आला आहे. सोबतच एका निर्माणाधीन इमारतीत 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळल्याने मुंबई शहर हादरलं आहे. काळाचौकी पोलिसांकडे सध्या त्याचा तपास आहे.

53 वर्षीय आईच्या हत्येमध्ये सकाळी पोलिसांनी 22 वर्षीय तिच्या लेकीला ताब्यात घेतलं आहे. आयपीसी 302 अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लेकीचं नाव रिंपल प्रकाश जैन आहे. तर मृत महिलेचं नाव वीणा प्रकाश जैन आहे. मृत महिलेचे हात, पाय कापलेले आहेत. हा खून डिसेंबर 2022 मध्ये झालेला आहे. या हत्येनंतर मुलीने आईचे हात-पाय कोयता, कटर आणि लहान चाकूने कापले. ही सारी हत्यारं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आरोपी  रिंपल प्रकाश जैनला 20  मार्च पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पहा ट्वीट

वीणा जैन बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने केली होती त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि हा प्रकार समोर आला. लालबाग मध्ये एका अंडर डेव्हलपमेंट इमारतीमध्ये 12 व्या मजल्यावर 19 वर्षीय मुलगा मृतावस्थेमध्ये आढळला आहे. मृत मुलाचे हात पाय बांधलेले होते. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल आहे. मृत मुलगा या इमारतीमध्येच काम करत होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif