Mumbai Shocker: कांदिवली च्या चारकोप मध्ये कचराकुंडी मध्ये सापडलं 7 महिन्याचं अर्भक

चारकोप परिसरातील अष्टविनायक सोसायटी इमारतीच्या कचऱ्याच्या डब्यात सोमवारी दुपारी एका प्रवाशाने हे बाळ पाहिले.

Foetus | Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबई मध्ये आज ( 31 डिसेंबर) 7 महिन्यांचं अर्भक कचरापेटी मध्ये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी एका व्यक्तीला रस्त्यावरून जात असताना हे अर्भक आढळलं. ही घटना कांदिवली (Kandivali)  मधील चारकोप (Charkop) भागात असलेल्या अष्टविनायक सोसायटीच्या इमारती जवळ असलेल्या कचराकुंडीतील आहे. अलर्ट मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनीअर्भकाला ताब्यात घेत पोस्ट मार्टम साठी हॉस्पिटल मध्ये पाठवले.

"आम्ही नवजात बाळाचा मृत्यू लपवून ठेवल्याचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा काही पुरावा आहे का याचा तपास करत आहोत. आम्ही परिसरातील गर्भवती महिला तसेच ज्या नुकत्याच बाळंत झाल्या आहेत त्यांचा तपशील गोळा करत आहोत," असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान सध्या पोस्ट मार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे, त्याआधारे गुन्हा दाखल होईल. असे पोलिसांनी सांगितले आहे. नक्की वाचा: Kerala: धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर राहिली गर्भवती; बाळाच्या जन्मानंतर भृण केला वॉशरूममध्ये फ्लश  .

परभणी मध्ये काही दिवसांपूर्वी सलग तिसर्‍यांदा मुलगी झाल्याने पतीने पत्नीचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये पत्नीला जिवंत जाळल्याने तिचा मृत्यू झाला आहे.