Mumbai Shocker: नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागात 100 महिलांना पाठवले अश्लिल मेसेज; आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या
मार्च 2022 मध्ये एका मुंबईकर फॅशन डिझायनर महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. अंधेरी भागात तिने तिच्या ऑफिसबॉय विरोधात ही तक्रार नोंदवली होती.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नुकतीच एका 48 वर्षीय व्यक्तीला पुण्यातून (Pune) अटक केली आहे. या व्यक्तीवर महिलांना अश्लील मेसेज पाठवण्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलांना व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर अश्लील व्हिडिओ आणि मॅसेज पाठवले आहे. हा प्रकार सुमारे 100 महिलांसोबत झाला आहे. काही रॅन्डम नंबर वर तो मेसेज करत होता. Rajkumar Raju Swami असं आरोपीचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे.
मार्च 2022 मध्ये एका मुंबईकर फॅशन डिझायनर महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. अंधेरी भागात तिने तिच्या ऑफिसबॉय विरोधात ही तक्रार नोंदवली होती. अशी माहिती हिंदुस्तान टाईम्समध्ये दिली आहे. तिच्या तक्रारीमध्ये फॅशन डिझायनरने आपला ऑफिसबॉय काही अश्लील मेसेज पाठवत असल्याचं आणि त्यानंतर त्याला ऑफिसमधून काढूनही टाकलं असल्याचं तिने म्हटलं आहे. पोलिसांच्या माहितीमध्ये त्याला डिझायनरच्या महिला सहकारींसोबत गैरवर्तन केल्याचं कारण देत कामावरून काढल्याचं सांगण्यात आलं आहे.
कामावरून काढल्याच्या रागामध्ये स्वामीने बदला घेण्याचं ठरवलं. त्याने काही अश्लील मेसेज डिझायनरला पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'स्वामी विरोधात तक्रारीवरून तपास सुरू झाला. त्याचा मोबाईल नंबर ट्रेस करण्यास सुरूवात झाली. पण त्याचं लोकेशन ट्रेस करणं कठीण जात होतं. त्याने सीम कार्ड काढून टाकलं होतं.मागील आठवड्यात त्याचा दोन पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याचं लोकेशन ट्रेसिंग सुरू झालं. पोलिस चौकशी मध्ये त्याने अशाप्रकारचे मेसेज 100 महिलांना पाठवल्याचं म्हटलं. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी अनेक महिलांना तो ओळखतही नव्हता. त्याने रॅन्डम काही नंबर डाएल केले. जर महिलेने फोन उचलला तर स्वामी तो नंबर सेव्ह करून त्याला मेसेज पाठवत होता. नक्की वाचा: पुणे: विद्यार्थिनीला अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांकडून अटक .
स्वामीने पोलिसांना दिलेल्या कबुलीमध्ये हा प्रकार आपण केवळ मज्जेसाठी केला आणि आपण मेसेज केलेल्या अनेक जणींना ओळखत नसल्याचंही म्हटलं आहे. पोलिसांनी स्वामी त्या महिलांचे प्रोफाईल पिक्चर पाहत होता आणि त्यांना मेसेज करत असल्याचं म्हटलं आहे. काही महिलांनी त्याला ब्लॉक केले होते. आता आयटी अॅक्ट खाली आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)