Mumbai Shocker: सेक्ससाठी नकार दिल्याने 18 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण, कवटी फोडली; 26 वर्षीय कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांकडून अटक
ती मृत झाल्याचे समजून तो घाबरला आणि फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून पळून गेला.
मुंबईमध्ये (Mumbai) एका 18 वर्षीय तरुणीने सेक्स (Sex) करण्यास नकार दिल्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी 26 वर्षीय कास्टिंग डायरेक्टर दीपक मालाकर (Deepak Malakar) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने शारीरिक संबंधांसाठी नकार दिल्याने दीपकने तिच्यावर इतके अत्याचार केले की, त्यामध्ये मुलीची कवटी अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाली. आरोपी मालाकर हा बिहारचा रहिवासी असून, 11 ऑगस्ट 2023 रोजी ही घटना घडल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता.
त्यानंतर तो गुजरातमधील सुरत येथे लपून बसला होता. माहितीच्या आधारे, मुंबई पोलिसांनी सुरत गाठले आणि सोमवारी म्हणजेच 14 ऑगस्ट 2023 रोजी दीपक मालाकरला अटक केली. माहितीनुसार, घटनेदरम्यान डोक्यावर अनेक वार झाल्याने मुलगी बेशुद्ध पडली होती. यानंतर दीपकने मुलीचा मृत्यू झाला असे समजून तेथून पळ काढला. काही वेळाने मुलगी शुद्धीवर आली आणि तिने मदत मागितली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिला दोन दिवस आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
बीएस्सी प्रथम वर्षात शिकणाऱ्या या तरुणीची दीपकशी गेल्या वर्षी फेसबुक या सोशल मीडिया साइटवरून मैत्री झाली होती. दोन महिन्यांपूर्वी तो मुलीच्या आई-वडिलांना तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशाने भेटला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी यासाठी होकार दिला. यानंतर दीपक तरुणीच्या 1 बीएचके घरात राहू लागला.
यादरम्यान त्याने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुलीने त्यासाठी नकार दिला. तिने सांगितले की, तिला आधी आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे. पुढे तिला हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावायचे आहे व त्यानंतर लग्न. यामुळे दीपक संतप्त झाला. त्यानंतर 11 ऑगस्ट 2023 रोजी दीपकने मुलीला वर्सोवा येथे त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर नेले आणि तिथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने त्याला विरोध केला. यामुळे दीपक पुन्हा तिच्यावर चिडला. (हेही वाचा: पत्नीला पॉर्न वेबसाइटवर सेक्स करण्यासाठी पतीकडून जबरदस्ती; सासऱ्याने कॉल गर्ल्सना बोलावून दाखवला Sex करण्याचा डेमो, गुन्हा दाखल)
त्यांनतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपकने मुलीचे डोके भिंतीवर आदळले आणि ती खाली पडेपर्यंत तिच्या चेहऱ्यावर वार करत राहिला. ती मृत झाल्याचे समजून तो घाबरला आणि फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून पळून गेला. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. यानंतर शेजाऱ्यांनी तिला मदत केली. सुरतला पळून गेल्यानंतर दीपकने आपला मोबाईल बंद केला होता. मात्र, तो लोकल क्रमांकावरून मित्राच्या संपर्कात होता. सुरत येथील एका एटीएममधून त्याने पैसे काढले होते यावरून पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली. पुढे मुंबई पोलिसांनी सुरत गाठून त्याला अटक केली. मलाकर विरुद्ध आयपीसी कलम 307, 342, 354 आणि 354 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.