मुंबई: शरद पवार आज दुपारी दोन वाजता पोहचणार ED कार्यालयात; दक्षिण मुंबई मध्ये 7 ठिकाणी संचारबंदी लागू

मुंबई येथील बॅलार्ड पियर येथे शरद पवार यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांतर्फे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दान प्रक्रिया संहितेच्या कलम 144अंतर्गत ही संचारबंदी लागू करण्यात आली असून या कारणास्तव कुलाबा, आझाद मैदान, डोंगरी, कफ परेड व संबंधित परिसरात चार हुन अधिक माणसांना एकाच वेळी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई: शरद पवार आज दुपारी दोन वाजता पोहचणार ED कार्यालयात; दक्षिण मुंबई मध्ये 7 ठिकाणी संचारबंदी लागू
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालया (ED) कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी आज मुंबईतील बलार्ड पियर (Ballard Pier)  येथील ईडी कार्यलयात दुपारी पवार यांची चौकशी होणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचा जमाव होऊन गोंधळ होऊ नये म्ह्णून दक्षिण मुंबई पोलिसांनी (South MUmbai Police) संचारबंधीचे आदेश दिले आहे. हे आदेश दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 च्या अंतर्गत देण्यात आले आहेत. यानुसार संबंधित परिसरात एकाच ठिकाणी 4 हुन अधिक माणसांना एकत्र जमण्यासाठी बंदी असणार आहे. यामध्ये कुलाबा (Colaba PS), कफ परेड (Cuffe Parade PS), मारिन ड्राइव्ह (Marine Drive PS) , आझाद मैदान (Azad Maidan PS) , डोंगरी ( Dongri PS) , जे जे मार्ग (JJ Marg PS) आणि एमआरए मार्ग (MRA Marg PS) या सात ठिकाणाचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी यासंदर्भात माहिती देत बॅलार्ड पियर परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव खाजगी वाहनांचा प्रवेश देखील बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे,दिवसभरात हा संपूर्ण परिसर नो पार्किंग झोन म्ह्णून ठेवला आहे, या ठिकाणी केवळ अधिकृत वाहनांचा प्रवेश दिला जाईल तसेच  याठिकाणी पोलिसांची  फौज देखील तयार ठेवण्यात आली आहे.

शरद पवार यांच्यावरील ED कारवाईच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; 'मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी'

मुंबई पोलीस ट्विट

मुंबई पोलिसांच्या या ट्विटला उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केले आहे. "तुम्हाला जे काही शक्य आहे ते करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करापण तरीही आम्ही पोहचणारच, तुम्ही तुमचे काम करा आम्ही आमचे काम करू. असे म्हणत आव्हाड यांनी एक प्रक्रारे मुंबई पोलिसांना आव्हान दिले आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, व अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक मोठया नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बँकेच्या व्यवहारात किंवा व्यवस्थापकीय स्तरावर आपला काहीच संबंध नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. आजच्या चौकशीनंतर याप्रकरणी पुढे तपास लागण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us