Mumbai Sathye College Student Dies Of Suicide: विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेज मध्ये 21 वर्षीय तरूणीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य; कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

पोलिसांनी साठ्ये कॉलेज मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे.

Mumbai Sathye College Student Dies Of Suicide:  विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेज मध्ये 21 वर्षीय तरूणीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य; कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
Dead Body | Pixabay.com

मुंबई मध्ये विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेज (Sathye College) मध्ये एका विद्यार्थीने आत्महत्या करत जीवान संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत विद्यार्थीनी 21 वर्षीय संध्या पाठक आहे. कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून तिने जीवन संपवलं आहे. संध्याने आत्महत्या का केली? याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान संध्याच्या कुटुंबियांनी मात्र तिच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. संध्याला पाठीमागून कोणीतरी धक्का दिल्याने हा प्रकार झाला असावा असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. दरम्यान साठ्ये महाविद्यालयाकडून अद्याप या घटनेवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या पोलिस संध्या पाठकच्या मित्र मैत्रिणींशी बोलून काही धागे दोरे सापडत आहेत का? हे पाहत आहेत.

संध्या साठ्ये कॉलेज मधील स्टॅटिस्टिक्स विभागात तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. आज सकाळी संध्या नेहमीप्रमाणे कॉलेजला आली. मात्र अचानक कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये संध्या गंभीर जखमी झाली. संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. कॉलेजने तातडीने हा प्रकार पोलिसांना कळवला.

पोलिसांनी साठ्ये कॉलेज मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात संध्याला नेण्यात आले मात्र तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक -

टेली मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891; निमहंस – 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन – 080-23655557 आयकॉल – 022-25521111आणि 9152987821; पीक माइंड – 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन – 9999 666 555

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).