Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय
मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) ही निर्णय दिला.
मुंबई (Mumbai) शहरासह राज्याला हादरवून टाकणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणी (Mumbai Sakinaka Rape Case) दोषी मोहन चौहान (Mohan Chauhan) याला फाशीची शक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) ही निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला आठ महिन्यांनी न्याय मिळाला आहे. न्यायालयाने मोहन चौहान (वय-45) याला न्यायालयाने 31 मे रोजीच दोषी ठरवले मात्र त्याच्या शिक्षेवर कोणताही निर्णय दिला नव्हता. न्यायालयाने अखेर त्याला आज शिक्षा ठोठावली.
साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडितेच्या बाजून राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडली होती. हे प्रकरण अगदी दुर्मीळातील दुर्मिळ असल्याने न्यायालाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाला केली होती. राज्य सरकारची विनंती मान्य करत न्यायालयाने प्रकरणात समोर आलेल्या साक्षी-पूराव्यांचा अभ्यास करुन आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली.
पाठिमागच्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी अवघ्या राज्याला हादरवून टाकणारी ही घटना साकीनाका येथील खैरानी रोडवर घडली होती. पोलिसांनी या घटनेचा 18 दिवसांमध्ये तपास पूर्ण करुन अहवाल दिला होता. तसेच, आरोपीवर गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणात राज्यासरकारने देखील स्पष्ट केले होते की महिलांवरील गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. राज्य सरकारने हे प्रकरण जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. राजा ठाकरे आणि महेश मुळे यांनी या प्रकरणात 30 पेक्षा अधिक साक्षीदार तपासले. त्यांचे जबाब घेतले. (हेही वाचा, Sakinaka Rape and Murder Case: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी दोषी, पीडितेला 8 महिन्यांनी मिळाला न्याय)
ट्विट
साकिनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा राजावाडी रुग्णालयात ( Rajawadi Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकले होते. त्यामळे महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. तिच्यावर होणाऱ्या कोणत्याच उपचाराला तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. तरीही डॉक्टरांचे एक पथक तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर तिच्या मृत्यूची बातमी आली. या प्रकरणामुळे राज्य हादरुन गेले होते. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक तीव्रतेने पुढे आला होता.