Mumbai Roads New Speed Limits: मुंबईकरांनो लक्ष द्या! आजपासून शहरात 9 मार्गांवर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध; जाणून घ्या सविस्तर
नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने 13 डिसेंबर 2023 पासून मुंबई शहरात नमूद मार्गावर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध घालण्यात येत आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी ( Mumbai Traffic Police आजपासून (बुधवार) शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांवरील नवीन वेग मर्यादा लागू केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने 13 डिसेंबर 2023 पासून मुंबई शहरात नमूद मार्गावर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध घालण्यात येत आहेत.
यामध्ये पी- डीमेलो रोड, शहिद भगतसिंग रोडवर ताशी 50 किलोमीटर (किमी प्रतितास) वेग मर्यादा घोषित केली आहे. तर गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस, महर्षी कर्वे रोडवरही 50 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल.
त्यानंतर हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, केशवराव खाडे मार्ग या ठिकाणीही 50 किमी प्रतितास ही मर्यादा असेल. पुढे बिंदू माधव चौक ते डॉ. केशव बलराम हेडगेवार चौक (लव ग्रोव्ह) जंक्शन, खान अब्दुल गफारखान रोड या ठिकाणी 60 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल.
डायमंड जंक्शन ते एम. टी. एन. एल. जंक्शन, एव्हॅन्यु - १, बी. के. सी. या ठिकाणी 60 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर 70 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. यासह जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) उड्डाणपुलावर चढण, उतरण व वळणावर वेग मर्यादा 30 कि.मी. प्रती तास आणि उड्डाणपुलावरील पूर्व/पश्चिम वाहिनीवर वेगमर्यादा 70 कि.मी. प्रती तास राहील. (हेही वाचा: Action Against Eateries In Mumbai: मुंबईमधील 239 रेस्टॉरंट्सवर FDA ची कारवाई; आढळले गलिच्छ स्वयंपाकघर, शिळे अन्न, कालबाह्य गोष्टी, मुंग्या आणि झुरळे)
वीर जिजामाता भोसले उड्डाणपुल, चेंबुर या ठिकाणी 60 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार 40 कि.मी. प्रति तास. या सोबत छेडा नगर येथील नवीन उड्डाणपुल (दक्षिणोत्तर) येथे 40 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार 40 कि.मी. प्रति तास असेल. अमर महल फ्लायओव्हरवर येथील वेग मर्यादा 70 किमी प्रतितास असेल. चढ व उतारावर 40 किमी प्रतितास मर्यादा असेल.