Mumbai Stray Dog: मुंबईत तीन वर्षांत 3 हजार श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ

या कालावधीत एकूण 19 हजार 158 परवाने जारी करण्यात आले आहेत.

Stray Dogs | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईत भटक्या श्वानांकडून मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये (2020 ते 2023) मुंबईत 3508 श्वान चावल्याच्या घटना घडल्या आहेत. महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहातून माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे यापैकी केवळ एक प्रकरण पाळीव श्वानाशी संबंधित असून उर्वरित प्रकरणात भटक्या श्वानांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे सातत्याने भटक्या श्वानांसाठी रेबीज लसीकरणाबाबत मोहीम राबविण्यात येते. तसेच, त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण राहावे यासाठी निर्बीजीकरणही करण्यात येते.  (हेही वाचा - Mumbai Customs: मुंबई कस्टमने जप्त केले 18.11 किलो पेक्षा जास्त सोने)

मुंबईत 2020 ते 23 या कालावधीत भटक्या श्वानांच्या चाव्यासोबतच पाळीव श्वानांचे परवाने जारी करण्यातही वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण 19 हजार 158 परवाने जारी करण्यात आले आहेत. तसेच, 2020 या वर्षात परवान्यांची संख्या 2581 होती. परवान्यामध्ये वाढ होत असतानाही योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कालावधीदरम्यान केवळ 49 पाळीव प्राण्यांच्या मालकांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेने केवळ भटक्या श्वानांच्या संख्येवर लक्ष न ठेवता भटक्या आणि पाळीव श्वानांवर होणाऱ्या क्रूरतेशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी एक समर्पित पोर्टल तयार करायला हवे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाळीव प्राण्यांचे मालक नियमांची अंमलबजावणी करतात का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.