Mumbai: कोरोना विषाणूची लढण्यासाठी Reliance Foundation ची मोठी मदत; मुंबईत करणार 875 Covid-19 बेड्सची तरतूद
त्याचबरोबर ट्रायडंट हॉटेल आणि बीकेसीमध्ये 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये सुमारे 875 बेडची व्यवस्था केली जाईल.
देशाची औद्योगिक व महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) कोव्हिड-19 च्या (Coronavirus) घटनांमध्ये होत असलेली वाढ पाहता अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनने (Reliance Foundation) उडी घेतली आहे. रूग्णांना चांगले उपचार देण्यासाठीच्या आपल्या मोहिमेला रिलायन्स फाउंडेशनने गती आणली आहे. त्याअंतर्गत फाउंडेशनने मुंबईतील कोरोना रूग्णांसाठी 875 बेडची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त, 100 नवीन आयसीयू बेडदेखील तयार केले गेले आहेत. तसेच नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, 1 मेपासून कोविड रूग्णांसाठी बांधलेल्या 550 बेडचे कोविड युनिट सांभाळेल. 15 मेपासून येथे गंभीर रुग्णांवर उपचार सुरु केले जातील.
रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. एवढेच नव्हे तर सेव्हन हिल्सच्या कोविड रूग्णांवरही मोफत उपचार केले जात आहेत. रिलायन्सच्या वतीने सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
रिलायन्स फाउंडेशनने वरळी येथे 650 बेडच्या कोविड केअरची सुविधा सुरु केली आहे. त्याचबरोबर ट्रायडंट हॉटेल आणि बीकेसीमध्ये 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये सुमारे 875 बेडची व्यवस्था केली जाईल. यामध्ये 145 आयसीयू बेडसह एनएससीआय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि बीकेसी येथे असलेल्या ट्रायडंटचा समावेश आहे. रिलायन्सने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि बीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुढाकार घेतला आहे.
नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील सर्व सुविधा जसे की- आयसीयू बेड, मॉनिटर्स, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय मशीन व 650 बेडसारख्या सर्व वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाऊंडेशन जारणार आहे. रुग्णांवर उपचार व मदत करण्यासाठी डॉक्टर, परिचारका आणि फ्रंटलाइन कर्मचार्यांचे 500 हून अधिक सदस्य चोवीस तास उपलब्ध असणार आहेत.