Mumbai Rape and Kidnapping Case: सोशल मीडीयात मैत्री करून 21 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोक्सो अॅक्टच्या कलम 4,8,12 खाली त्याला अटक झाली आहे. आरोपी वर किडनॅपिंग आणि बलात्काराचे आरोप करण्यात आले आहे.
बदलापूर मध्ये चिमुरडींवर शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता मुंबई (Mumbai) तील एका 13 वर्षीय मुलीवर 21 वर्षीय मुलाकडून दोनदा बलात्कार (Rape) झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीची पीडीतेसोबत सोशल मीडीयाच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यानंतर हा घृणास्पद प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पहिल्यांदा आरोपीने मुलीला अंधेरी (Andheri) मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर गुजरात (Gujrat) मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. मुलगी घरी आल्यानंतर तिने घडल्या प्रकाराची माहिती दिली.
पीडीतेच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिस स्थानकामध्ये जाऊन तक्रार केली आहे. मुलीने इंस्टाग्राम वरून आरोपीचा फोटो दाखवला आणि त्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान वाकोला पोलिस स्टेशन मध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक.
अल्पवयीन मुलीवर मुंबई आणि गुजरात मध्ये बलात्कार
पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोक्सो अॅक्टच्या कलम 4,8,12 खाली त्याला अटक झाली आहे. आरोपी वर किडनॅपिंग आणि बलात्काराचे आरोप करण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, पीडीत मुलगी 13-16 ऑगस्ट दरम्यान घरातून गायब होती. पालकांनी तिची शोधाशोध केली मात्र ती स्वतःच घरी परतली. घरी आल्यानंतर ती एकटी एकटी राहत असल्याचं पालकांच्या लक्षात आलं आणि पुढे हा सारा प्रकार उघड झाला. FIR दाखल झाल्यानंतर मुलीला कूपर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तेथे तिची वैद्यकीय तपासणी झाली. कोर्टात चार्जशीट फाईल करताना त्यामध्ये हा वैद्यकीय रिपोर्ट देखील असेल. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहे.