Mumbai Rain : मुंबईतील मिठी नदीत वाहून गेलेल्या दोघांपैकी एक Javed Alam Shaikh याचा मृतदेह सापडला, एक अद्यापही बेपत्ता
पोलीसांनी मॅनिला दोरीचा वापर करत हा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवताना तो जावेद अस्लम शेख या तरुणाचा असल्याचे पुढे आले. मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली.
मुंबई (Mumbai) येथील मिठी नदीत (Mithi River) वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृतदेह हातील लागला आहे. जावेद अस्लम शेख (Javed Alam Shaikh) असे या तरुणाचे नाव आहे. मुंबईतल एका उड्डाणपुलाजवळील खाडीत एक बेरवारत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. पोलीसांनी मॅनिला दोरीचा वापर करत हा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवताना तो जावेद अस्लम शेख या तरुणाचा असल्याचे पुढे आले. मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली.
जावेद अस्लम शेख आणि त्याचा मित्र आसिफ हे दोघे माहीम (Mahim) येथील दर्ग्यात मध्यरात्रीच्या वेळी दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री हे दोघे खाडीवर उभे होते. या वेळी एकाचा पाय घसरला आणि तो वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. दुर्दैवाने तोही पाण्यात पडला आणि वाहून जाऊ लागला. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. परंतू, रात्रीच्या अंधारामुळे मदत आणि बचाव कार्यास मर्यादा आल्या. त्यातच पाऊसही होता. दरम्यान, सकाळी दिवस उजाडल्यावर शोधमोहीम सुरु केली असता एकाचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या मित्राचा शोध घेतला जात होता. (हेही वाचा, Thane: ड्रग्ज प्रकरणात वाँटेड नायजेरियन व्यक्तीचा मृतदेह जंगलात आढळला)
ट्विट
जावेद आणि आसिफ हे दोघे कुर्ला येथे निवासास होते. दोघेही मध्यरात्रीच्या वेळी माहीम येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्गात दर्शन घेतल्यावर हे दोघेही जवळ असलेल्या माहिम खाडीवर गेले. दरम्यान, घरी परतत असताना शैचाला जाण्यासाठी दोघे खाडीच्याजवळ गेले. दरम्यान, एकाचा तोल जाऊन तो खाडीत पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसराही धावला मात्र एकमेकांना वाचविण्याच्या गडबडीत दोघेही वाहून गेले.