Mumbai Rain Update: मालाड जवळ पश्चिम दृतगती मार्गावर भूस्खलन व दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प (See Photos)
मुंंबईच्या (Mumbai) पश्चिम दृतगती मार्गावर (Western Expressway) मालाड (Malad) येथे दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प झाल्याचे समजत आहे.
मुंंबईच्या (Mumbai) पश्चिम दृतगती मार्गावर (Western Expressway) मालाड (Malad) येथे दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प झाल्याचे समजत आहे, काल रात्री पासुन मुंंबई व उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. ANI या वृत्तसंंस्थेने याठिकाणचे काही फोटो शेअर केले असुन यात आपण पाहु शकता की पावसामुळे माती वाहु लागल्याने ही दरड कोसळली आहे. याशिवाय रस्त्यावरील एक विजेचा पोल सुद्धा कोसळुन पडला आहे. याठिकाणी आता दरड बाजुला करण्याचे प्रयत्न केले जात असुन सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. काही वेळापुर्वी आयएमडीचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी सुद्धा ट्विट करुन याठिकाणच्या भुस्सखलनाचा व्हिडिओ शेअर केला होता.ही परिस्थिती पुर्वव्रत करण्यासाठी काही वेळ लागणार असुन तोपर्यंत याठिकाणची वाहतुक ठप्प झाली आहे.
दुसरीकडे, मुंबईत आज सकाळपासुन पावसाने चांगलाच जोर धरलाय, यामुळे मुंबईतील सखल भाग म्हणजेच परेल, हिंदमाता परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काल रात्री पासुन सुरु झालेला हा पाउस आणखीन 48 तास कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंंबई, ठाणे, व उत्तर कोकणासाठी सध्या रेड अलर्ट देण्यात आला आहे
ANI ट्विट
के.एस. होसाळीकर ट्विट
दरम्यान आज मुंंबईच्या समुद्रात 12:47 वाजता 4.51 मीटर उंच लाटा उसळणार आहेत,अशा वेळी नागरिकांंनी घरातुन बाहेर पडु नये अशी सुचना बीएमसीकडुन करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व अन्य आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.