Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, पालघमध्येही पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी

पुढच्या 3 ते 4 तासांच मुंबई आणि पालघरमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Rainfall (PC- ANI)

राज्यात आज संध्याकाळी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईसह (Mumbai) पालघरमध्येही (Palghar) पावसाने हजेरी लावली.  पुढील चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या म्हणजे रविवार 26 नोव्हेंबर आणि सोमवार 27 नोव्हेंबर रोजी पावसाचा यलो अर्लट देण्यात आलाय. अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने त्यांना पिकाची काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, काही भागात अवकाळीसह गारपीटचा धोका)

पाहा पोस्ट -

मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. पुढच्या 3 ते 4 तासांच मुंबई आणि पालघरमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif