मुंबई: विनातिकीट प्रवासी पकडताना टीसी अरुण गायकवाड यांचा अपघाती मृत्यू; कसारा ते उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना

कोकण रेल्वे विभागात ते गेली 20 वर्षे टी.सी (Railway Ticket Collector) म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मिक मृत्यू अशी घेतली.

central railway mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

रेल्वे सेवेत कर्तव्य बजावत असताना एका तिकीट तपासणीसाचा (Railway Ticket Collector) दुर्दैवी अंत झाला. अरुण गायकवाड असे मृत टी.सीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अरुण गायकवाड (Arun Gaikwad) हे एका विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाटलाग करत होते. दरम्यान, रल्वे रुळावर पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कसारा रेल्वे स्टेशन (Kasara Railway Station)ते उंबरमाळी रेल्वे स्टेशनदरम्यानच्या ( Ummambali Railway Station) मार्गावर घडली.

कल्याण स्टेशन येथे पुष्पक एक्सप्रेस या गाडीत अरुण गायकवाड हे शुक्रवारी सकाळी 9 वाजता चढले. पुढे त्यांनी कर्जत स्टेशनवरुन परत येणाऱ्या गाडीत कर्तव्य बजावण्यासाठी प्रवेश केला. त्यांनी प्रवाशांची तिकीटे तपासण्या सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी एका विनातिकीट प्रवाशाला पकडले. परंतु, या प्रवाशाने गाडी कसारा आणि खर्डीदरम्यान असलेल्या उंबरमाळी स्टेशन सिग्नलला थांबली. या संधीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवाशाने पळ काढला. प्रवाशाने पळ काढल्याचे ध्यानात येताच अरुण गायकवाड यांनीही त्याचा पाटलाग केला. (हेही वाचा, मुंबईच्या ट्राफिकमुळे यकृताचा लोकलने प्रवास; अशाप्रकारे प्रवास होणारी भारतातील पहिली घटना)

दरम्यान, पाटलाग करताना रुळावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. रल्वे कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांना रुग्णालयात तातडीने नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कोकण रेल्वे विभागात ते गेली 20 वर्षे टी.सी (Railway Ticket Collector) म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मिक मृत्यू अशी घेतली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif