Mumbai Pune Expressway Traffic Update: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वर वाहनांची लांबच लांब रांग

मुंबई-पुणे जुन्या पुलावर गाड्या बंद पडत असल्याने अनेक मुलं, महिला रस्त्यावर बसूनच टोविंग व्हॅन, मेकॅनिकची प्रतिक्षा करताना दिसत आहे

Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

2023 चं इयर एंड सेलिब्रेशन सुरू झालं आहे. सर्वत्र नाताळ (Natal)  सोबतच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले आहेत. ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन (New Year Celebration) हे विकेंडला जोडून आल्याने यंदा आनंदाला उधाण आहे. अनेक जण मुंबई, पुणे शहराबाहेर नववर्षाच्या स्वागताला जात आहेत. आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express way) वर त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. बोरघाटात 10 किमी लांब पर्यंत वाहनं उभी होती. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक रेंगाळलेली पहायला मिळाली आहेत. अडोली टनेल च्या आधीपासून अमृतांजन ब्रिजपर्यंत आणि पुण्याकडे जाणारी खंडाळ्यापर्यंतची वाहतूक रेंगाळली आहे. जुन्या एक्सप्रेस वे वर देखील खोपोली हद्दीमधील बोरघाटामध्येही अनेक वाहनं बंद पडल्याने ट्राफिक जाम झाले होते.

मुंबई-पुणे जुन्या पुलावर गाड्या बंद पडत असल्याने अनेक मुलं, महिला रस्त्यावर बसूनच टोविंग व्हॅन, मेकॅनिकची प्रतिक्षा करताना दिसत आहे. पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद आहेत. नक्की वाचा: Mumbai-Pune Expressway: मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार; एमएसआरडीसीने घेतला मोठा निर्णय .

सलग सुट्ट्यांमुळे अनेकांचा बाहेर पडण्याचा प्लॅन आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ठिकठिकाणी आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खंडाळा घाटाचा परिसर चढणीचा असल्याने अनेक वाहने गरम होऊन बंद पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच काही ठिकाणी वाढली आहे.

लोणावळ्याला देखील अनेकांनी पसंती दर्शवली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई ठिकठिकाणी करण्यात आली आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहनांच्या संख्येपुढे रस्ते कमी पडत असल्याने वाहतूक कोंडींचा त्रास अनेकांना होत आहे.