Mumbai-Pune Expressway: पुणे-मुंबई महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, पाच जण जगीच ठार

ही घटना मावळ तालुक्यातील शिलाटणे (Sheelatne Village) गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेमळे घडली. अपघात इतका भीषण (Pune Accident) होता की, अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai National Highway) झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील शिलाटणे (Sheelatne Village) गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेमळे घडली. अपघात इतका भीषण (Pune Accident) होता की, अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मुंबईकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटनर आणि पुण्याच्या दिशेने साधारण त्याच वेगाने पुण्याकडे जाणारी फोर्ड कार एकमेकांवर आदळले. अपघाताचा मोठा आवाज झाला. त्यामुळे अपघाताची माहिती परिसरात समजली. त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा (Police) यांनी तातडीने घटनास्थळी उपस्थिती लावली.

कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हे वाहन मुंबईच्या दिनेशे पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरखाली घुसली. कारचा वेग इतका होता की कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला दुभाजक ओलांडून धडक दिली. ही घटना अनपेक्षीतपणे घडल्यामुळे कंटेनर चालकाला आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे कार काही फूट कंटनेरसोबत फरफटत गेली. यात कारमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Mumbai - Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बोर घाटात भीषण अपघात, 3 ठार, 6 जखमी)

अपघाताची माहिती कळताच महाराष्ट्र सुरक्षा बल, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्त, पोलीस यंत्रणा घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. मात्र त्यांना अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. पुणे-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. असे या मार्गाने नेहमी प्रवास करणाऱ्यांचा दावा आहे.