वरळी मध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी; आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून अभिनंदन
वरळीमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे अभिनंदन करताना त्यावर 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख केलेला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर आता विजयी उमेदवारांचे सेलिब्रेशन जोशात सुरू झाले आहे. मुंबईमधील वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Vidhan Sabha Constituency) निवडून आलेले शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्सही झळकायला सुरूवात झाली आहे. जनतेने महायुतीला कौल दिल्याने आता शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून शिक्कामोर्तब करणार का? अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे अभिनंदन करताना त्यावर 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख केलेला आहे.
वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या दिलीप माने यांच्यावर मात केली आहे. आदित्य ठाकरे सुमारे 65 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. अभिजीत बिचुकले हे देखील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी 'या' तीन उमेदवारांपैकी एकाची लागणार वर्णी.
आदित्य ठाकरे यांची पोस्टर्स
2019 च्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये शिवसेनेला 56, भाजपाला 105, राष्ट्रवादीला 54, कॉंग्रेसला 44 तर इतर 29 जागांवर आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर 145 चा आकडा गाठण्यासाठी महराष्ट्रात नवी समीकरणं उदयाला येऊ शकतात