Mumbai Police कडून गिरगाव चौपाटी वरील 90 वर्ष जुनं Bachelorr’s पाडण्यासाठी BMC ला पत्र; पहा काय आहे कारण!
या ठिकाणी स्ट्रीट स्टाईल फास्ट फूडचे पर्याय ज्यामध्ये शेक्स, पिझ्झा, रॅप्स, सॅन्डव्हिच आणि ज्युसची चव चाखण्यासाठी खवय्ये गर्दी करतात.
दक्षिण मुंबई मधील विशेष आकर्षण असलेला भाग म्हणजे मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty ). या भागामध्ये अनेक जुनी आणि खवय्यांची हक्काची खाण्याची ठिकाणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे Bachelorr’s. पण मीडीया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी बीएमसीकडे हे Bachelorr’s कहं आऊटलेट हटवण्याची मागणी करणारं पत्र दिलं आहे. या आऊटलेट मुळे ट्राफिक होत असल्याचं कारण देण्यात आलं आहे.
गिरगाव चौपाटी जवळ असणारं Bachelorr’s हे सुमारे 9 दशकं जुनं आऊटलेट आहे. या ठिकाणी स्ट्रीट स्टाईल फास्ट फूडचे पर्याय ज्यामध्ये शेक्स, पिझ्झा, रॅप्स, सॅन्डव्हिच आणि ज्युसची चव चाखण्यासाठी खवय्ये गर्दी करतात. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिस डीसीपी झोन 2 ऑफिस कडून बीएमसी च्या डी वॉर्डला पत्र लिहण्यात आले आहे. यामध्ये अप्रिय घटना टाळण्यासाठी पालिकेने यांना दिलेल्या परवानग्या मागे घ्याव्यात, बेकायदेशीर बांधकाम पाडावं असं म्हटलं आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांच्या आऊटलेट समोर पार्किंग मुळे वाहतूकीवर परिणाम होतो. joint commissioner of police (law and order) Satyanarayan Chaudhary यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सिनियर आयपीएस ऑफिसर्स कडून देण्यात आलेल्या माहितीमध्येही Bachelorr’s हटवणं गरजेचे आहे. कारण ते रस्त्याच्या कडेला लागून आहे. हा रस्ता वीआयपी रोड आहे. जर बॅचलर्स समोर गर्दी होत असेल तर त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतूकीवर होतो. यामुळे नागरिकांसोबत अप्रिय घटना होण्याची शक्यता आहे.
डी वॉर्डचे अधिकारी आता यापुढे निर्णय घेणार आहे. अद्याप पालिकेकडून प्रत्युत्तर आलेले नाही. सूत्रांनी एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, बॅचलर्सच्या मालकांना देखील या घडामोडींची माहिती नाही. त्यांच्या दाव्यानुसार ट्राफिक बॅचलर्स मुळे नव्हे तर सध्या कोस्टल रोडचं जे काम सुरू आहे त्यामुळे झालं आहे.