New Year Celebration: नवीन वर्षाच्या स्वागतापुर्वी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ, समुद्र किनारी सुरक्षा वाढवली
गेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत
31 डिसेंबरला (New Year Celebration) रात्री मुंबईतील विविध ठिकाणांसह गेट वे ऑफ इंडियासह इतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. मुंबई पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे. नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. 18 बोटींपैकी 16 बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर 2 बोटी स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Mumbai Traffic Police Advisory: नववर्षाचा जल्लोष, मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम आणि प्रतिबंध लागू; घ्या जाणून)
गेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत. सेलिब्रेशनसाठी लोकांनी समुद्रात जाऊ नये यासाठीही पोलीस लक्ष देणार आहेत.
दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणार, हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. त्याशिवाय, पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवले. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांना ताब्यात घेतले आहे. अजामिनपत्र वॉरंटची अंमलबजावणी करून 77 जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या 49 कारवाया करण्यात आलेल्या असून त्यात चाकू तलवारी शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत.