Coronavirus ला लवकरात लवकर हरविण्यासाठी मुंबई पोलिसांनी सांगितले 'हे' महत्त्वाचे सूत्र

मुंबई पोलिसांनी एका ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. असे केल्यास सुटण्यासाठी खुप वेळ लावणारे गणित या सुत्राने खुप कमी वेळात सुटेल, लवकर परिक्षा संपेल असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Mumbai Police | (File Photo)

कोरोनो व्हायरस (Coronavirus) या महाभयाण विषाणूविरुद्ध संपूर्ण देश लढत आहे. या रोगाला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यात कोरोनाला देशातून पळवून लावण्यासाठी कोविड योद्धा (COVID Warriors) रात्रंदिवस एक करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून ते लोकांची सेवा करत आहे. अशा परिस्थितीत भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून आपले सुद्धा कर्तव्य बनते आपण त्यांना साथ दिली पाहिजे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक महत्त्वाचे सूत्र सांगितले आहे. ज्याच्या माध्यमातून आपण कोरोनाला लवकरात लवकर हरवू शकतो.

मुंबई पोलिसांनी सांगितलेले हे महत्त्वाचे सूत्र म्हणजे 'एकमेकांमध्ये 6 फूटांचे अंतर ठेवणे'. मुंबई पोलिसांनी एका ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. असे केल्यास सुटण्यासाठी खुप वेळ लावणारे गणित या सुत्राने खुप कमी वेळात सुटेल, लवकर परिक्षा संपेल असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. Coronavirus Update: ठाणे, कल्याण येथे एकाच दिवशी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पाहा ट्विट

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 72 हजार 287 वर पोहचली आहे. यापैंकी 4 हजार 177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 39 हजार 744 जणांना कोरोनावर मात केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.