Mumbai Police on Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती; बिश्नोई गँगबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून घटनेनंतर दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाशी संबधित आणखी दोघांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.

Photo Credit - ANI

Mumbai Police on Baba Siddique Murder Case :   ज्येष्ठ राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची शनिवारी संध्याकाळी मुंबईत सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने राजकीय आणि मनोरंजन या दोन्ही उद्योगांमध्ये खळबळ उडाली आहे. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मोठे खुलासे केले आहेत. बाबा सिद्दीकींना सुरक्षा होती, मात्र नॉन कॅगराईज सुरक्षा होती. त्यांना Y प्लस सुरक्षा नव्हती. मात्र, तीन पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होता. घटनास्थळी ज्यांनी गोळीबार केला, ते तीन लोक होते. त्यातील दोन पकडण्यात आले होते. एकजण फरार झाला होता. त्याचा तपास करण्यात येतोय." अशी माहिती मुंबई गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  (हेही वाचा  -  Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झीशान अख्तर चौथा आरोपी, जाणून घ्या त्याच्याबद्दल )

या प्रकरणात लॉरेंन्स बिश्नोई गँगचा जो रोल आहे, त्याबाबतही चौकशी करत आहोत. बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तिघांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून घटनेनंतर दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाशी संबधित आणखी दोघांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.

बाबा सिद्दिकी यांना नियमीत सुरक्षा होती. घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी होते. तसेच या प्रकरणात लॉरेंन्स बिष्णोई गँगच्या सहभागाबाबत आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणात आरोपींवर या पूर्वी कुठल्या गुन्ह्याची नोंद आहे का हे तपासत आहोत. जे दोन फरार आरोपी आहेत त्याचीही ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात इतर राज्यातील पोलिसांची मदत देखील घेतली जावू शकते असे त्यांनी सांगितले.