Guidelines For New Year Celebrations In Mumbai: मुंबईकरांनो लक्ष द्या! पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध जारी
यातील अनेकजण मुंबईवरील किनारपट्टीवर नवीन वर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम जारी केले आहेत.
Guidelines For New Year Celebrations In Mumbai: देशभरात लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची (New Year 2025 Celebrations) तयारी करत आहेत. यासाठी 31 डिसेंबर 2024 च्या रात्री पार्ट्यांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये नवीन वर्षानिमित्त लोक खास सेलिब्रेशन करतात. देशभरातून लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी खास ठिकाणी जात असतात. यातील अनेकजण मुंबईवरील किनारपट्टीवर नवीन वर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम जारी केले आहेत.
मोठ्या आवाजात गाण्यांवर निर्बंध -
आता मुंबईकरांना मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई पोलिसांनी सोसायट्यांना पार्टीच्या वेळी इमारतीच्या टेरेसचे कोपरे पडद्यांनी झाकण्याचा सल्ला दिला आहे. टेरेसची कडा कमी असेल तर याठिकाणाहून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. पब, बार आणि रेस्टॉरंट्स नवीन वर्षाच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. ध्वनीच्या डेसिबल मर्यादेच्या अटीवर विचार होईपर्यंत छतावरील किंवा टेरेस पार्ट्यांना संगीतासह परवानगी आहे. (हेही वाचा - Mumbai Police Busts Cyber Scam: मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त)
मुंबईत बीचवर विशेष पथके -
जुहू, वर्सोवा, वांद्रे बँडस्टँड, वरळी सी फेस, मरीन ड्राइव्ह आणि गोराई बीच यांसारख्या लोकप्रिय हॉटस्पॉट्सवर विशेष पथके तैनात करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांकडून व्यापक सुरक्षा योजना राबविण्यात आली आहे. आठ अतिरिक्त आयुक्त, 29 उपायुक्त, 53 सहायक आयुक्त, 2,184 पोलिस अधिकारी आणि वाहतूक कर्मचाऱ्यांसह 12,048 कर्मचारी तैनात करणार आहेत. अतिरिक्त उपायांमध्ये SRPF प्लाटून, QRT टीम, BDDS पथके, RCP युनिट्स आणि मुख्य ठिकाणी तैनात होमगार्ड यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Mumbai Police: अटकेची नोटीस, धमकी मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करा; मुंबई पोलिसांचे अवाहन)
शहरात विविध ठिकाणी चेकपॉईंट उभारण्यात येणार -
ड्रिंक आणि ड्रायव्हिंग तपासण्यासाठी शहरातील विविध पॉईंट आणि जंक्शनवर चेकपॉईंट उभारण्यात येणार आहेत. गैरव्यवहार, बेकायदेशीर दारू विक्री आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्यांसह दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुंबई पोर्ट ट्रस्टने (एमबीपीटी) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणत्याही मंडळाच्या पार्ट्या करू नयेत, असं जाहीर केलं आहे.