मुंबई मध्ये घर भाड्याने देणार्यांसाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
प्रत्येक घर मालकाला प्रॉपर्टीबाबत व्यवहार करताना त्यांच्या भाड्याने देण्याच्या व्यवहारात आता पारदर्शकता ठेवावी लागणार आहे.
मुंबई मध्ये पोलिसांनी आता घरं किंवा इतर ठिकाणं भाड्याने देण्यासाठी आता सारी कागदपत्रं दाखल करणं आवश्यक आहे. बुधवार (8 मार्च) पासून पुढील 60 दिवसांसाठी हे आदेश लागू असतील. दरम्यान त्याचे उल्लंघन करणार्यांना इंडियन पिनल कोड (Indian Penal Code) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या आदेशाचा उद्देश विध्वंसकारी आणि असामाजिक घटकांना निवासी भागात लपून बसण्यापासून रोखणे आहे.
"विध्वंसक, असामाजिक घटक रहिवासी भागात लपून बसू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाला धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची आणि खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता आहे," असे आदेशामध्ये नमूद करण्यात आली आहे. Bomb Threats: मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब ठेवल्याचा दावा; नागपूर पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा कॉल .
प्रत्येक घर मालकाला प्रॉपर्टीबाबत व्यवहार करताना त्यांच्या भाड्याने देण्याच्या व्यवहारात आता पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. त्या संबंधिची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये देताना सारी माहिती आणि कागदपत्र द्यावी लागणार आहेत असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ज्या व्यक्तीला राहण्याची जागा भाड्याने दिली असेल किंवा ती परदेशी असेल तर त्यांनी शहरात राहण्याच्या कारणासह सर्व तपशील द्यावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.