Nagpada Building Collapse: मुंबईच्या नागपाडा येथील मिश्रा इमारतीच्या शौचालयाचा काही भाग कोसळल्याने आजी-नातीचा मृत्यू; मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबईतील (Mumbai) मालाडमधील व महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण मुंबईतील नागपाडा (Nagpada) परिसरातील मिश्रा इमारतीच्या (Mishra Building) शौचालयाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरूवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आजीसह त्यांची नात या दोघींचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली सामग्री अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दुर्घनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत.
भायखळा पश्चिम येथील शुक्ला स्ट्रीट मार्गावरील मिश्रा या इमारतीच्या गुरुवारी दुपारी कोसळला होता. त्यावेळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, रुग्णवाहिका, पोलीस आणि महापालिका विभाग कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, या दुर्घटनेत नूर कुरेशी (70) आणि त्यांच्यी नात आलिया कुरेशी (12) या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे, दुर्घटनाग्रस्त इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने वेळोवेळी नोटी दिली होती, अशीही माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-Nagpada Building Collapse: मुंबईतील नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
एएनआय ट्वीट-
यापूर्वीही मुंबईत मागील संततधार पाऊस सुरू असल्याने इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात फोर्ट येथे इमारत कोसळली होती. त्याचबरोबर मालाडमध्येही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टपाल मुख्यालयाजवळील पाच मजली ‘भानुशाली’ इमारतीचा काही भाग लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला. यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता.