IPL Auction 2025 Live

Mumbai Police: अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एकट्या वृद्धांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना गाठून त्यांच्याशी सलगी वाढवत आणि विशिष्ट काळानंतर त्यांना अश्लिल व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Arrest | (Photo credit: archived, edited, representative image)

एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना गाठून त्यांच्याशी सलगी वाढवत आणि विशिष्ट काळानंतर त्यांना अश्लिल व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील खार पोलिसांनी (Mumbai khar Police) केलेल्या कारवाईत या टोळीतील केअर टेकर (Care Taker) असलेल्या एका मुलीसह चौघांना अटक केली आहे. नीतू (20 वर्षे), अनिल चौहान (32), किरण नायर (24) आणि राजेश केवट (34) अशी अटक केलेल्या आरपींची नावे आहेत. आरोपी एकटे असलेल्या वृद्धांना हेरत आणि त्यांना जाळ्यात ओढत त्यांच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागत. सध्या सर्व आरोपी खार पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी आतापर्यंत किती नागरिकांना गंडवले आहे याबातब त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे.

पैसे द्या नाहितर 'तो' व्हिडिओ व्हायरल करेन

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन शेठ हे खार परिसरात एकटेच राहतात. त्यांनी आपली देखभाल करण्यासाठी केअर टेकर म्हणून एका मुलीची एजन्सीमार्फत नेमणूक केली होती. कामावर आलेल्या मुलीचे वर्तन शेठ यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे निश्चित पगारापेक्षाही पाचशे रुपये अधिक देत त्यांनी तिला दुसऱ्या दिवसापासून कामावर येऊ नको असे सांगितले. यावर सदर मुलीने सेठ यांच्याकडून पगार आणि वाढीव रक्कम स्वीकारली आणि ती निघून गेली. मात्र, त्या मुलीने दुसऱ्या दिवशी सेठ यांना फोन केला आणि तुमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यावर सेठ यांनी बाळ तू माझ्या मुलीसारखी आहेस. असे असभ्य का बोलते आहेस असे विचारणा करत तिच्या एजंटला (एजन्सी) फोन केला. मात्र, त्यांना भलताच अनुभव आला. एजंटने त्यांच्याकडे चक्क एक लाख रुपयांची मागणी केली. (हेही वाचा, Revenge Porn Case Shocks Nagpur: पॉर्न द्वारे घेतला बदला, प्रेयसीचे अश्लिल व्हिडिओ, छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल; नागपूर येथील धक्कादायक प्रकार)

आरोपींना सापळा रचून अटक

केअर टेकर मुलगी आणि त्यांचा मॅनेजर यांची चाल लक्षात येताच सेठ यांनी न घाबरता पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. ते खार पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी संशयीतांविरोधात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 385 आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येताच गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि आरोपींना अटक केली. नीतू नामक मुलगी आणि एक एजंट पोलिसांच्या गळाला लागला. त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून पोलिसांनी इतरांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी गुन्हा कबल केला आहे. यात आणखी दोघेजण गुंतले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना खार येथू अटक केली.