उद्योगपती Ratan Tata यांच्या गाडीचा नंबर वापर करणाऱ्या महिला आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

ट्रफिक नियमांचे उल्लंघन केल्याने रतन टाटा यांना ऑनलाईन चलन पाठवण्यात आले. यावेळी ही बाब उघडकीस आली. आरोपी महिला आपल्या गाडीवर रतन टाटांच्या कारचा नंबर वापरत होती.

Ratan Tata (Photo Credit - ANI)

मुंबईत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या गाडीचा नंबर वापर करणाऱ्या महिला आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रफिक नियमांचे उल्लंघन केल्याने रतन टाटा यांना ऑनलाईन चलन पाठवण्यात आले. यावेळी ही बाब उघडकीस आली. आरोपी महिला आपल्या गाडीवर रतन टाटांच्या कारचा नंबर वापरत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या म्हणण्यानुसार तिला अद्याप हे माहित नव्हतं की, तिच्या गाडीवरील नंबर रतन टाटाच्या कारचा नंबर आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला एका ज्योतिषाने आपल्या गाडीसाठी विशेष नंबर प्लेट वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ही महिला आपल्या गाडीवर संबंधित नंबर प्लेटचा वापर करत होती. मुंबई पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण रात्री उघडकीस आलं. त्यामुळे या महिला आरोपीला ताबडतोब चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलं नाही. या महिलेला आता बुधवारी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले आहे. चौकशीनंतर या महिलेला अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात भादंवि कलम 420 आणि 465 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला होता. तथापि, त्यांनी कोणत्याही रहदारी नियमांचे उल्लंघन केलेले नव्हते. वरळी येथे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रतन टाटा यांना ई-चलन पाठविण्यात आले. यावर, टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या कारने वाहतुकीचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे ही गंभीर बाब समोर आली. (Rohit Pawar यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र; म्हणाले, MPSC परीक्षेच्या खुल्या वर्गासाठीची कमाल मर्यादेची अट रद्द करा, अशा आशयाचे परिपत्रक मागे घ्या)

दरम्यान, ई-चलान जिथून दिले गेले तेथून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. पोलिसांना चौकशीत असे आढळले की, एका गाडीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. ज्या कारवर रतन टाटांच्या कारचा नंबर होता. ही महिला आपल्या गाडीवर रतन टाटांच्या कारचा नंबर लावत होती. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बूक सह वाहनांच्या कागदपत्रांची वैधता आता 31 मार्च 2021 पर्यंत ग्राह्य; Ministry of Road Transport & Highways ची माहिती)

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारला गाठण्यात पोलिसांना यश आले. ही कार एका कंपनीशी संबंधित होती, जिची मालक एक महिला आहे. या महिलेच्या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माटुंगा पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "ज्योतिषशास्त्रीय क्रमांकाचा फायदा घेण्यासाठी आरोपींनी मूळ नंबर प्लेटमध्ये बदल करून बनावट नंबर प्लेट वापरली. रतन टाटा यांच्या मालकीच्या कारला पाठविलेले सर्व ई-चालान आता आरोपींकडे वर्ग करण्यात आले आहेत. आम्ही लोकांना कोणत्याही परिस्थितीत बनावट नंबर प्लेट वापरू नका असे आवाहन करतो. मात्र, तरीदेखील अशा स्वरुपाचे प्रकरणे समोर येतात."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif