Porn apps Case: Raj Kundra पाठोपाठ Ryan Tharp ला नेरूळ मधून अटक; Mumbai Police Crime Branch ची कारवाई
या प्रकरणामध्ये आतापर्यंत राज सह 11 जण पोलिसांच्या कोठडीत आहेत.
पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच कडून अजून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. काल रात्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) याला झाली आहे. यानंतर 10 तासांत आता क्राईम ब्रांचने नवी मुंबईतील नेरूळ मधून Ryan Tharp ला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत राज सह 11 जण पोलिसांच्या कोठडीत आहेत. राज कुंद्रा वर अश्लील फिल्म बनवण्याचे आणि त्यांना काही अॅप वर दाखवण्याचे आरोप आहेत. राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी बराच वेळ झालेल्या चौकशी नंतर अटक केली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती.
मुंबई क्राईम ब्रांच च्या माहितीनुसार, राज कुंद्रा या प्रकरणी मास्टर माईंड आहेत. राज कुंद्रा आणि त्यांचा ब्रिटेन मध्ये राहणारा ब्रदर इन लॉ यांनी केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे. ज्याच्या द्वारा 'हॉट शॉट्स' वर पॉर्न फिल्म दाखवल्या जातात. 'हॉट शॉट्स' हे अॅप आहे. हे सध्या गूगल आणि अॅपल स्टोअर ने डाऊन केले आहे. या फिल्मच्या व्हिडिओ भारतामध्ये शूट केल्या जातात आणि वी ट्रांसफरच्या माध्यमातून परदेशात पाठवल्या जातात.
ANI Tweet
मुंबई क्राईम ब्रांच च्या टीमकडून आज (20 जुलै) राज कुंद्राला कोर्टात दाखल केले जाणार आहे. पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याचं त्यांचं मत आहे. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणार्या उमेश कामथ ला देखील अटक केली आहे.